सांगलीत मदन भाऊ पाटील युवा मंचच्यावतीने शव वाहिकेसाठी भिक मांगो आंदोलन

सांगलीत मदन भाऊ पाटील युवा मंचच्यावतीने शव वाहिकेसाठी भिक मांगो आंदोलन


सांगली : महापालिकेच्या शववाहिका नादुरूस्त आहेत. त्यामुळे त्या वारंवार बंद पडत आहेत. मृतांच्या नातेवाईकांना शववाहिका ढकलून सुरु करावी लागत आहे. तरीही पालिका प्रशासन याकडे लक्ष देत नाही. यांच्या निषेधार्थ मदनभाऊ पाटील युवा मंचच्या वतीने शववाहिकेसाठी भिक मांगो आंदोलन करण्यात आले.
युवा मंचचे जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. लेंगरे म्हणाले, महापालिकेची शववाहिका बंद पडत आहे. त्यामुळे शव नेताना अनेकदा गाडी बंद पडते. त्यावेळी मृतांच्या नातेवाईकांना धक्का मारून गाडी सुरु करावी लागते. काहीवेळा खासगी वाहनांतून मृतदेह न्यावा लागत आहे. हा नागरिकांच्या भावनांशी खेळ सुरू आहे.
पुशासन घनकचऱ्यासारख्या कोट्यवधी रूपयांचा प्रकल्प बेकायदेशीरपणे राबवत आहे. त्यावर कोट्यवधींची उधळपट्टी होत आहे. पदाधिकाऱ्यांसाठी नवीन वाहने दर ५-६ वर्षानी खरेदी केला जातात. मात्र शववाहिकेसाठी पालिकेकडे निधी नाही हे दुर्देवी आहे.



यासाठी मदनभाऊ युवा मंचने भिक मागून नागरिकांतून पैसे गोळा करीत आहेत. ही भीक पालिकेला शववाहिकेसाठी देण्यात येणार आहे. सत्ताधारी व प्रशासनाने तातडीने नवीन शववाहिका खरेदी करावी अन्यथा यासाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा लेंगरे यांनी दिला.


या आंदोलनात मदन भाऊ युवा मंचचे कार्याध्यक्ष शीतल लोंढे युवराज इंगळे, अण्णा आठवले, किरण यादव, मयुर बांगर, सुनील कांबळे, राकेश साणकर, रोहित सावळे, नितीन माने, सचिन ठोकळे, चिंटू पवार, संकेल आलासे, अवधूत गवळी, शरद गाडे सहभागी झाले होते.

Src test

AC NEWS RADIO l बाहेर पडताना काळजी घ्या l मास्क लावूनच बाहेर पडा l गर्दीत जाण्याचे टाळा l सैनी टायझर नेहमी जवळ ठ...