AC News 31.12.2021

l बाहेर पडताना काळजी घ्या l मास्क लावूनच बाहेर पडा l गर्दीत जाण्याचे टाळा l सैनी टायझर नेहमी जवळ ठेवा आणि वापर करा l बाहेरून आल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवा l सौजन्य : परीक्षेची सर्व पुस्तके आणि स्टडी मटेरियलसाठी एकमेव नाव : नोकरी संदर्भ द बुक गॅलरी, संपर्क - 0233-2324832 || यु ट्यूब चॅनल, रेडिओ चॅनल, वेब पोर्टल बनविण्यासाठी अवश्य संपर्क करा : अमरजीत चोपडे : 9175633501
radio

शुक्रवार दि. 31 डिसेंबर 2021



थर्टी फर्स्ट घरीच, साधेपणाने साजरा करा : पोलीस अधीक्षक गेडाम यांचे आवाहन

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विना मास्क आढळल्यास 500 रुपयांची पावती

नव्या वर्षात प्रत्येक जिल्ह्यात सायबर पोलीस ठाणे : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

सांगली महापालिका क्षेत्रात 3 जानेवारी रोजी 15- 18 वयोगटातील लसीकरण

हळदीवर जी एस टी न आकारण्याबाबत पाठपुरावा करू : ललित गांधी यांचे आश्वासन

कोरोनाचे नियम पाळून जत येथील श्री यल्लमा देवी यात्रेस प्रारंभ

पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

सांगलीचे पहिले आमदार सय्यद अमीन यांच्या स्मृती दिनानिमित्त 2 जानेवारी रोजी विशेष कार्यक्रम

कोरोना काळात कलाकार आणि डॉक्टर यांचे कार्य मोलाचे : माजी आमदार नितीन राजे शिंदे

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

कर्मवीर पतसंस्था ग्राहक सेवेत अग्रभागी राहील : रावसाहेब पाटील

 

इस्लामपूर : कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सांगली च्या इस्लामपूर शाखेचा ३ रा वर्धापन दिन मोठया उत्साहाने साजरा झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन रावसाहेब जिनगोंडा पाटील होते.

स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी केले . त्यांनी संस्थेच्या सांपत्तीक स्थितीची आढावा सादर केला. संस्थेचे संपुर्ण कामकाज ऑनलाईन कोअर बँकींग असून संस्थेच्या ठेवी ६०८ कोटी आहेत तर संस्थेने रुपये ४६ ५ कोटीचे कर्ज वाटप केले आहे. संस्थेचे भागभांडवल रु. २६ कोटी ७५ लाख आहे. संस्थेचा स्वनिधी ५८ कोटी आहे. संस्थेची गुंतवणूक १८८ कोटी आहे. संस्थेस सतत ऑडीट वर्ग अ आहे. संस्थेचा निव्वळ एन पी ए शुन्य टक्के आहे.

संस्थेची सभासद संख्या ४५००० इतकी आहे.  संस्थेचे प्रशस्त आधुनिक मुख्यालयाचे सांगली येथे काम अंतिम टप्प्यात असून हे कार्यालय पतसंस्थाच्या क्षेत्रात वेगळेपण निर्माण करील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

श्री. पाटील पुढे म्हणाले की , सर्वात्तम ग्राहक सेवा हा आमचा ध्यास आहे. त्यामध्ये आधुनिक सेवेवर आमचा भर राहील . संस्थेच्या ५१ शाखामधुन जाताना तेथील सभासदांनी दिलेला विश्‍वास आमच्या कार्याला बळ देत आहे असे ते म्हणाले. त्या सर्व सभासदांनी त्यांनी धन्यवाद दिले.

या प्रसंगी प्रा. शिंदे , अँड. अभिजीत परमणे , गणेश देवाडिगा , सुहास माने , श्री. बांदल , संतोष मोकाशी, भरत पाटील , कैलाश शेळके , आदि सभासदांनी आपले मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या. या वेळी नुतन सल्लागार म्हणुन डॉ, युवराज शांतीनाथ पाटील , नंदकुमार केशवराव पवार ,  सतिश महावीर शेटे , सिकंदर बाबालाल मुजावर , प्रकाश हिंदुराव शिंदे , भरत आण्णा पाटील यांची नेमणूक करुन त्यांचा सत्कार करणेत आला.

या कार्यक्रमास संस्थेच्या व्हाईस चेअरमन श्रीमती भारती चोपडे , संचालक अँड एस.पी. मगदूम . डॉ. नरेंद्र खाडे , डॉ. रमेश वसंतराव ढवू, अ. के. चौगुले , लालासो भाऊसो धोटे , संचालिका सौ. ललिता अशौक सकळे , तज्ञ संचालक डॉ. एस.बी. पाटील ( मोटके ) मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल श्रीपाल मगदूम, संतोष मोकाशी , आर बी माने, अवधुत पेठकर , नितीन सुतार ,रविंद्र सुर्यवंशी , रमेश सूर्यवंशी यांचे सह मोठया प्रमाणात सभासद हजर होते. आभार संस्थेचे संचालक श्री. वसंतराव धुळाप्पाण्णा नवले यांनी मानले . सुत्रसंचालन संजय सासणे यांनी केले


आ. सुधीर गाडगीळ यांच्या घरी चोरीचा प्रयत्न : भाजपा तर्फे निवेदन

 

सांगली : आ. सुधीर गाडगीळ यांच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला, ही बाब धक्कादायक आहे. आमदारांच्याच

घरी चोर चोरीचा प्रयत्न करत असतील तर सर्वसामान्य सुरक्षित कसे राहतील, असा सवाल भाजप पदाधिकार्‍यांनी केला आहे. या पदाधिकार्‍यांनी प्रभारी अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांना निवेदन दिले.

भाजपचे संघटन सरचिटणीस दीपक माने, मनपा गटनेते विनायक सिंहासने, अल्पसंख्याक प्रदेश सचिव अशरफ वांकर, ओबीसी मोर्चा अध्यक्ष अमर पडळकर, नगरसेविका सविता मदने, महिला मोर्चा प्रदेश सदस्य स्मिता पवार, ज्योती कांबळे, व्य माने, धनेश कातगडे, प्रथमेश आ शांतिनाथ कर्वे आदींनी हे निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे, चोऱ्या व दरोडा घालणार्‍यांत पोलिसांबाबतची भीती राहिलेली नाही. चोरी, चेन स्नॅचिंग, कॉलेज व हायस्कूलवर मुलींवर होत असलेल्या छेडछाडीबाबत पोलिस गस्त व निर्भया महिला पथक वाढविण्यात यावे आदींसह अन्य मागण्या केल्या आहेत.


हिंदकेसरी माने यांच्या जयंतिनिमित्त सांगलीत क्रीडा शिक्षकांचा गौरव

 

सांगली : हिंदकेसरी पै. मारुती माने (भाऊ) यांच्या ८३ व्या जयंतीनिमित्त सांगली जिल्हा शारीरिक शिक्षक संघटना यांच्यावतीने सांगली महापालिकेसह जिल्ह्यातील ११० क्रीडा शिक्षकांचा सत्कार महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उपमहापौर उमेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सांगली हायस्कूलच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमोद पाटील उपस्थित होते.

सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यातील क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी करून राज्य, राष्ट्रीय खेळाडू घडवणार्‍या शिक्षकांच्या कार्याची दखल घेऊन सांगली जिल्हा शारीरिक शिक्षक संघटना यांच्या बतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष जनार्दन झेंडे, उपाध्यक्ष जितेंद्र पाटील, अशोक पाटील, सुधाकर माने, परशुराम लोंढे,

उदय गायकवाड, राजेंद्र पाटील, यशवंत चव्हाण, शहाजी खरमाटे,  बिजय बिराजदार उपस्थित होते.


कोळी समाज कायदा शिबिरास प्रतिसाद

 

सांगली : कोळी समाजाचे प्रलंबित प्रश्‍न आणि दाखल्यामध्ये दोष काढून अनेकांच्या नोकरीवर आणण्यात

आलेले गंडांतर यावर कायदे शिबिरात अँड. के. एन. कांदेकर, अँड. श्रीकांत पन्हाळे, डॉ. मनोहर कोळी, प्रा. बी. एस. गुरव यांनी मार्गदर्शन केले.

येथील नगरवाचनालयामध्ये महर्षी वाल्मिकी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. अँड. कांदेकर यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयातील अधिसंख्यपदाच्या  केसेसबाबत

मार्गदर्शन केले. डॉ. कोळी यांनी अधिसंख्य पदावरील कर्मचार्‍यांचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा करा, असे आवाहन सभेचे अध्यक्ष जयेश तरे यांना केले. अध्यक्ष एकनाथ सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष सहदेव कोळी, आर. जी. कोळी, अरुण कोरे, गुंडा कोळी, आप्पासाहेब कोळी, विलास मस्के आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.


मोदींना २०२४ मध्ये जनताच घरी बसवेल

 

सांगली : लोकांच्या योगदानामुळे आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने भारत

स्वतंत्र केला. हे काँग्रेस पक्षाचे कधीही न फिटणारे क्रण आपल्यावर आहेत. नेते निमित्तमात्र आहेत. जी कामे होतात त्याचे सारे श्रेय काँग्रेस पक्षाला आहे. पक्षाने घडवलेला देश मोदी विकत आहेत. महागाईने लोक त्रस्त आहेत. त्यामुळे २०२४ मध्ये जनताच मोदींना घरी बसवेल, असे प्रतिपादन जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केले.

येथील काँग्रेस भवनमध्ये काँग्रेस पक्षाच्या १३७वा वर्धापनदिन व काँग्रेस सेवा दलाच्या स्थापनादिन कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी ध्वजवंदन, बंदेमातरम्‌, झेंडा गीत व राष्ट्रगीत गायन आणि सेवा दलाचे संस्थापक नारायण हर्डीकर व म. गांधी यांच्या प्रतिमेला पाटील यांच्याहस्ते, तर स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस प्रा. एन. डी. बिरनाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी प्रास्ताविकात काँग्रेस व सेवा दलाची वाटचाल ब योगदान माहिती दिली.

प्रा. बिरनाळे म्हणाले, काँग्रेस पक्षामुळे देशाचा चौफेर विकास झाला आहे. कृषिप्रधान भारत काँग्रेसने मजबूत केला आहे. पंडित नेहरू, पटेल, गांधी, बोस व अनेक कुटुंबीयांच्या त्यागातून हा देश उभा राहिला आहे. पक्षाच्या असंख्य नेत्यांनी रक्त सांडून स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. यासाठी 'घर घरमे काँग्रेस मन मन मे काँग्रेस, तिरंगा बचाव' अभियान राबवूया.

यावेळी अशोक वारे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच कालीचरण साधूंनी महात्मा गांधी यांच्याबद्दल अनुद्गार काढल्याने त्यांचा निषेध ठराव बाबगोंडा पाटील यांनी मांडला. यावेळी काँग्रेस व सेवा दलाच्या वतीने कालीचरण साधूचा जाहीर निषेध करण्यात आला.

यावेळी अल्लाबक्ष मुल्ला, अरुण पळसुले, सुभाष पट्टणशेट्टी, आयुब निशाणदार, विठ्ठल काळे, हणमंत यादव, शमशाद नायकवडी, जन्नतबी नायकवडी, रामलिंग परदेशी, अशोक रजपूत, सुनीता मदने, नीलम कांबळे, सुजाता सूर्यवंशी उपस्थित होत्या. काँग्रेस सेवा दलाचे अरुण पळसुले यांनी स्वागत केले.


आणीबाणीत कारावास भोगलेल्यांचा गौरव

 

सांगली : आणीबाणीमध्ये कारावास भोगलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व जनसंघाच्या नेते, कार्यकर्त्यांचा भाजपकडून ऋणगौरव करण्यात आला. भाजपच्या आजच्या यशात जुन्या निष्ठावंतांचे योगदान मोठे असल्याचे उद्‌गार भाजपचे प्रदेश सरचिटणीस पृथ्वीराज पवार, माजी आमदार नितीन शिंदे यांनी काढले.

माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधून भाजपाचे प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार यांच्या संकल्पनेतून मारूती चौकात क्रणगौरव कार्यक्रम घेण्यात आला. माजी आमदार नितीन शिंदे, प्रकाश बिरजे, श्रीकांत शिंदे, चंद्रकांत सूर्यवंशी प्रमुख उपस्थित होते.

देशात आणीबाणी जाहीर झाल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व जनसंघाच्या अनेक नेते व कार्यकर्त्यांची धरपकड केली. त्यांना तुरुंगात डांबले. अशा नेते व कार्यकर्त्यांचा ऋणगौरव करण्यात आला.

बापूसाहेब पुजारी, अशोकराव ओक, सुलभाताई जोशी, धनपाल कर्वे, रामभाऊ सुतार, डॉ. केळकर, अरविंद मराठे, गजानन पटवर्धन, हेमंत कानिटकर, मधुसुदन देवल, प्रकाश मूळगुंड, महादेव टेके, विलास आपटे, दिलीप कुलकर्णी, प्रकाश बिरजे, कृष्णाजी आठवले, प्रदीप ओगले, अनंत गोरे, अवधूत ठोसर, सुभाष कुलकर्णी, आण्णा माने, श्रीकांत शिंदे आदी आणीबाणीत कारावास भोगलेल्या नेते, कार्यकर्त्यांचा ऋणगौरव सत्कार करण्यात आला.

स्वागत अविनाश मोहिते यांनी केले. नगरसेवक युवराज बावडेकर, उर्मिला बेलवलकर, अनिकेत खिलारे, प्रथमेश वैद्य, रवींद्र बादवणे, बाळ रजपूत, स्मिता पवार, रेखा पाटील, विशाल पवार व कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Src test

AC NEWS RADIO l बाहेर पडताना काळजी घ्या l मास्क लावूनच बाहेर पडा l गर्दीत जाण्याचे टाळा l सैनी टायझर नेहमी जवळ ठ...