अंकलखोप येथे पकडली 4 फुटी मगर

अंकलखोप येथे पकडली 4 फुटी मगर

अंकलखोप ( ता. पलुस ) येथील वैभव नगर रोड लगत असलेल्या राजेंद्र यादव यांच्या शेतातील घराजवळील विहिरीतून साधारण ४ फुट लांबीची मगर पकडून वन विभागाच्या ताब्यात देण्यात आली. वन विभागाकडून सदर मगरीला निसर्ग अधिवासात सोडण्यात आले.
ऑगस्ट२०१९ च्या महापुराच्या पाण्यातुन आलेलं १ फुट लांबीचे मगरीचे पिल्लू अंकलखोप येथील राजेंद्र यादव यांच्या शेतातील घराजवळील विहिरीत विसावले होते. या मगरीच्या पिलाची शारीरिक वाढ झाली असून, सध्या या मगरीची लांबी सुमारे चार फुट झाली आहे. ही मगर वारंवार विहिरीतून बाहेर येऊन पुन्हा पाण्यात जात होती.परंतू या मगरीला पकडता येत नव्हते. त्यामुळे यादव कुटूंबाला काळजी लागली होती. सध्या यादव यांच्या विहीरीचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाच्या भिंतीच्या मध्ये हि मगर अडकून राहिली असल्याचे यादव यांना दिसून आले. त्यातुन बाहेर पडण्यासाठी ही मगर धडपडत होती. मात्र सुटका होत नव्हती. तेंव्हा राजेंद्र यादव, त्यांचा मुलगा संदीप यादव, पुतण्या राहूल व संतोष यांनी प्रयत्न करून तिला विहिरीतून बाहेर काढले. त्यानंतर वन विभागाला सदर घटनेची कल्पना देऊन, सदर मगर वनविभागाच्या ताब्यात देण्यात आली. पलूसचे परिमंडल वनअधिकारी मारुती ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे नियतक्षेत्र अधिकारी शहाजी ठवरे, वन सहाय्यक सागर गोयकर, प्राणीमित्र विवेक सुतार, मोहसीन सुतार यांनी सदर मगरीला ताब्यात घेऊन, सुरक्षितपणे निसर्ग अधिवासात सोडले‌.

भाजप सरदार गप्प का? कोर्टात जाण्याचा सल्ला का? : उत्तम साखळकर यांनी डागली प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर तोफ


भाजप सरदार गप्प का? कोर्टात जाण्याचा सल्ला का? : उत्तम साखळकर यांनी डागली प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर तोफ

सांगली : महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पासाठी निविदा साद कण्याची अंतिम मुदत दो दिवसावर आली आहे. ही संपूर्ण प्रक्रिया बेकायदेशीर आहे याबाबत सत्ताधारी भाजपचे आमदार गप्प का आहेत ? प्रकल्पाबाबत शंका उपस्थित केल्यास प्रशासन कोर्टात जाण्याचा सल्ला का देत आहेत? असे प्रश्न करत विरोधी पक्ष नेते उत्तम साखळकर यांनी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली.

भाजप कारभाऱ्यांचे मौन

पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, महापालिका प्रशासनाने महासभेला अंधारात ठेऊन घनकचरा प्रकल्पाच्या कामाची फेर निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याला कॉँग्रेससह अन्य संघटनांनी विरोध केला आहे. भाजपमधील एका गटाचाही विरोध आहे. हा विषय महासभेत आणून तेथे सर्व सहमतीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून फेर निविदा मागवण्यात आली. याची मुदतही दोन दिवसात संपणार आहे मात्र अद्याप महासभेत हा विषय घेण्याचा निर्णय महापौरांनी घेतला नाही. हा प्रकल्प संशयाच्या भोवऱ्यात असताना सत्ताधारी भाजपचे कारभारी तसेच दोन्ही आमदार याबाबत एक शब्दही बोलण्यास तयार नाहीत, ते त्यांची भूमिका का जाहीर करीत नाहीत? कोणाच्या फायद्यासाठी हा प्रकल्प उभारला जात आहे? असा सवाल साखळकर यांनी केला.

आयुक्तांचा कोर्टात जाण्याचा सल्ला

ते पुढे म्हणाले, या प्रकल्पाबाबत नगरसेवक, कार्यकर्त्यांनी शंका उपस्थित केल्यास आयुक्त त्यांना न्यायालयात जाण्याचा सल्ला देत आहेत. मात्र माहिती देत नाही, असे काय गुपित या प्रकल्प आहे. यातून कोणाचा फायदा होणार आहे? महापालिका कायदा व नियमाने चालते. महासभेला सर्वाधिकार आहेत. मात्र महासभा घेण्यास नकार देऊन आयुक्त कोर्टात जाण्याचा सल्ला कसा देतात? हा प्रकल्प साठ कोटी रुपयांचा असताना ७२ कोटीच्या निविदा कशा काढल्या? अतिरिक्त चारा कोटी रुपयांना कोण जबाबदार? निविदा भरण्यास पंधरा दिवस मुदतवाढ देऊनही मध्ये संधी असताना महासभा का घेतली नाही? कोणाचे कोटकल्याण करण्यासाठी हा सर्व घाट घातला जात आहे.? अशी प्रश्नांची सरबत्ती करून सत्ताधारी भाजपचा हाच पारदर्शी कारभार आहे का? हे आमदारांनी जाहीर करावे, अशी मागणी साखळकर यांनी केली.

सांगलीत पेट्रोल व डिझेलच्या दरवाढी विरोधात काँग्रेसचे आंदोलन


सांगलीत पेट्रोल व डिझेलच्या दरवाढी विरोधात काँग्रेसचे आंदोलन

सांगली : सांगली कॉंग्रेस भवन येथे सांगली शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली व आमदार विक्रम सावंत, श्रीमती जयश्रीताई पाटील व श्रीमती शैलजा भाभी पाटील यांच्या उपस्थितीत केंद्रातील हुकुमशाही मोदी सरकार विरुद्ध अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटी च्या सूचनेनुसार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन करण्यात आले.

व्हिडिओ चित्रीकरण स्क्रिनद्वारे भांडाफोड

या वेळी मोठी स्क्रीन लाऊन केंद्रातील सत्ता येण्या अगोदर बीजेपी नेत्यांनी आता पर्यंत जे जे पेट्रोल दरवाढी बदल बोलले होते व आता ते कसे बदलत आहेत हे त्याच्या व्हिडिओ चित्रीकरण द्वारे जनतेला दाखवून भांडा फोड करण्यात आला. या मुळे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार ७ जूनपासून दररोज पेट्रोल-डिझेलमध्ये दरवाढ करत सामान्य जनतेला लुटत आहे. देश कोरोना सारख्या गंभीर संकटाचा सामना करत असताना मोदी सरकार मात्र अन्यायी पेट्रोल व डिझेल दरवाढ करुन  सर्व सामान्य जनतेची लूट करत आहे हे उघड झाले आहे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी ने हे वेगळे आंदोलन केल्यामुळे सर्वाचे लक्ष वेधून घेतले.

सामान्य जनतेची लुट

या वेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रचंड कमी असतानाही मोदी सरकार त्याचा लाभ सामान्य जनतेला देत नाही. कोरोनामुळे लोकांचे रोजगार गेले आहेत, उद्योग-व्यवसाय अजून पूर्वपदावर आलेले नाहीत, त्यात ही भाववाढ सामान्य जनतेवर अन्याय करणारी आहे. दररोजच्या थोडी थोडी भाववाढीमुळे पेट्रोल प्रति लिटर ९.१२ रुपये तर डिझेल ११.०१ रुपयांनी वाढले आहे त्यामुळे एक लिटर पेट्रोलला ८७-८८ रुपये मोजावे लागत आहेत. काही राज्यांमध्ये डिझेल पेट्रोलपेक्षा जास्त महाग झाले आहे. ही भाववाढ अशीच राहिली तर पेट्रोल व डिझेल १०० रुपये लिटर होण्यास जास्त अवधी लागणार नाही. या परिस्थितीत केंद्रातील हुकुमशाही मोदी सरकार जनतेला वेठीस धरत आहेत म्हणुन कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आज सर्व ठिकाणी धरणे आंदोलन करून इंधन दरवाढ मागे घेण्याची मागणी केली जात आहे. आंदोलना नंतर भारताचे राष्ट्रपती महामहिम मा.रामनाथ कोव्हीद यांना मा.जिल्हाधिकारी सांगली यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले आहे. 

कॉंग्रेसची स्पीक अपॉन पेट्रोलियम प्राईसेस मोहिम

डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती १६४ डॉलर प्रति बॅरलपर्यंत वाढल्या असतानाही त्याचा बोजा सामान्यांवर पडणार नाही याची काळजी घेत इंधनाचे दर स्थिर ठेवले होते. २०१४ मध्ये पेट्रोलवर उत्पादन शुल्क हे ९.४० रुपये तर डिझेलवर ३.५६ रुपये होते. केंद्रातील भाजप सरकारने हेच शुल्क पेट्रोल ३२.९८ रुपये तर डिझेल ३१.८३ रुपये पर्यंत वाढवले आहेत. त्यामुळे इंधन दरवाढ करुन सुरु असलेली नफेखोरी बंद करावी, व भाववाढ तात्काळ मागे घेऊन सर्वसामान्यांना न्याय द्यावा. या मध्ये सर्व सामान्य जनतेला सहभागी करून घेत कॉंग्रेस #SpeakuponPetroleumPrices ही ऑनलाईन मोहिमही सोशल मीडियावर चालवत आहे, जनतेने या माहिमेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले.

लक्षणीय उपस्थिती

यावेळी नामदेवराव मोहिते, बाळासाहेब पाटील, बाळासो गुरव, राजेंद्र शिंदे, आर आर पाटील, माणिक भोसले, अवीराजे शिंदे, आप्पासो शिंदे, विरोधी पक्ष नेते उत्तम साखळकर, नगरसेवक मंगेश चव्हाण, संतोष पाटील, फिरोज पठाण, मनोज सरगर, नगरसेविका वहिदा नाईकवाडी, शुभांगी साळुंखे, मदीना बारुदवाले, अमर निंबाळकर, रवींद्र वळीवडे, बिपिन कदम, शेवंताताई वाघमारे, अल्ताफभाई पेंढारी, सनी धोत्रे, सौरभ पाटील, इरफान मुल्ला, विजय जाधव, योगेश राणे, आयुब निशाणदार, आशिष चौधरी, प्रशांत चव्हाण, चंद्रकांत आंबी, मौला व्हटमूरे, धनराज सातपुते, डॉ.राजेंद्र मेथे, डॉ. प्रताप भोसले, कयूम पटवेगार, अशोकसिंग राजपूत, संतोष भोसले, इलाही बारुदवाले, रफिक मुजावर, अरुण पळसुले, माणिक कोलप, राजेंद्र कांबळे, याकुब मनेर, वृषाली वाघचोरे, ताजुद्दीन तांबोळी, सकलेन मुजावर, अजित दोरकर, विलास बेले, श्रीनाथ देवकर, सौरभ साळुंखे, प्रमोद सूर्यवंशी, अमित पारेकर, अँड.भाऊसाहेब पवार, राजेंद्र कांबळे, अर्जुन कांबळे, आकाश शेंडे, सद्दाम कलावंत, अकबरभाई मोमिन, शुभम बनसोडे, डी पी बनसोडे, प्रशांत आयवळे, जावेद मुल्ला, अमीर इनामदार, चैतन्य पाटील, सोहेल बलदंड, समीर मुजावर, विजय आवळे, सुभाष पट्टणशेट्टी, शैलेंद्र पिराळे, नामदेव चव्हाण, विक्रम वाघमोडे, विठ्ठल काळे, मंदार सूर्यवंशी, रोहित कोळेकर, रमेश जाधव, उदयसिंह शिंदे, रामचंद्र चव्हाण, सचिन चव्हाण, अरबाज शेख, कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सांगलीत मदन भाऊ पाटील युवा मंचच्यावतीने शव वाहिकेसाठी भिक मांगो आंदोलन

सांगलीत मदन भाऊ पाटील युवा मंचच्यावतीने शव वाहिकेसाठी भिक मांगो आंदोलन


सांगली : महापालिकेच्या शववाहिका नादुरूस्त आहेत. त्यामुळे त्या वारंवार बंद पडत आहेत. मृतांच्या नातेवाईकांना शववाहिका ढकलून सुरु करावी लागत आहे. तरीही पालिका प्रशासन याकडे लक्ष देत नाही. यांच्या निषेधार्थ मदनभाऊ पाटील युवा मंचच्या वतीने शववाहिकेसाठी भिक मांगो आंदोलन करण्यात आले.
युवा मंचचे जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. लेंगरे म्हणाले, महापालिकेची शववाहिका बंद पडत आहे. त्यामुळे शव नेताना अनेकदा गाडी बंद पडते. त्यावेळी मृतांच्या नातेवाईकांना धक्का मारून गाडी सुरु करावी लागते. काहीवेळा खासगी वाहनांतून मृतदेह न्यावा लागत आहे. हा नागरिकांच्या भावनांशी खेळ सुरू आहे.
पुशासन घनकचऱ्यासारख्या कोट्यवधी रूपयांचा प्रकल्प बेकायदेशीरपणे राबवत आहे. त्यावर कोट्यवधींची उधळपट्टी होत आहे. पदाधिकाऱ्यांसाठी नवीन वाहने दर ५-६ वर्षानी खरेदी केला जातात. मात्र शववाहिकेसाठी पालिकेकडे निधी नाही हे दुर्देवी आहे.



यासाठी मदनभाऊ युवा मंचने भिक मागून नागरिकांतून पैसे गोळा करीत आहेत. ही भीक पालिकेला शववाहिकेसाठी देण्यात येणार आहे. सत्ताधारी व प्रशासनाने तातडीने नवीन शववाहिका खरेदी करावी अन्यथा यासाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा लेंगरे यांनी दिला.


या आंदोलनात मदन भाऊ युवा मंचचे कार्याध्यक्ष शीतल लोंढे युवराज इंगळे, अण्णा आठवले, किरण यादव, मयुर बांगर, सुनील कांबळे, राकेश साणकर, रोहित सावळे, नितीन माने, सचिन ठोकळे, चिंटू पवार, संकेल आलासे, अवधूत गवळी, शरद गाडे सहभागी झाले होते.

तासगावात पत्रकाराला मारहाण


तासगावात पत्रकाराला मारहाण

तासगाव : वाळू, मुरूम वाहतुकीबद्दल बातमी लावल्याच्या कारणावरून मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी अमोल संतोष धोत्रे (रा, विटा रोड, तासगाव) याच्या विरोधात तासगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला. राजेश पतंगराव थोरात (रा. तासगाव) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. फिर्यादित म्हटले आहे की, रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्याच्या कार्यालयात बसले असता संशयिताने वाळू व मुरूम वाहतुकीच्या बातम्या लावतोस असे म्हणून हातातील दगडाने कानाजवळ मारून जखमी केले. गळ्यातील एक तोळा वजनाची चेन तोडून व डाव्या हाताच्या बोटातील अंगठी काढून घेतल्याचे तसेच आई सोडवायला आल्या असता त्यांना ढकलून देऊन जखमी केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. पोलिसांनी अमोल धोत्रे याला ताब्यात घेतले.

सांगलीच्या कॉलेज कॉर्नर परिसरात अपघात


सांगलीच्या कॉलेज कॉर्नर परिसरात अपघात

सांगली : सांगलीच्या कॉलेज कॉर्नर परिसरात एका कारने रस्ता दुभाजकाला जोरदार धड दिली. या धडकेत मोटार (एम एच. १० बी.एम. ५६०३) चे मोठे नुकसान झाले. लोखंडी दुभाजक तुटला आहे. दुभाजकाचेही नुकसान झाले. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. सोमवार दि. २९ रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
आपटा पोलीस चौकीकडून भरधाव वेगाने येणारी मोटार कॉलेज कॉर्नर जवळ डावीकडे वळलात असताना चालकाचा मोटारीवरील ताबा सुटल्याने थेट मोटार दुभाजकावरच आदळली. यामध्ये मोटारीचे तसेच दुभाजकाचे नुकसान झाले. अपघातानंतर मोठा आवाज झाला. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. काहीवेळ वाहतूकही विस्कळीत झाली होती. अचानक मोबाईल वाजल्यानंतर तो घेत असताना खाली पडला. तो उचलण्यासाठी चालक खाली वाकला आणि क्षणाधार्थ गाडीवरचा ताबा सुटून गाडी दुभाजकावर आदळली.

रयत शिक्षण संस्था सातारा सचिवपदी डॉ. विठ्ठल सुबराव शिवणकर यांची निवड


रयत शिक्षण संस्था सातारा सचिवपदी डॉ. विठ्ठल सुबराव शिवणकर यांची निवड

वाळवा : रयत शिक्षण संस्था सातारा सचिवपदी डॉ. विठ्ठल सुबराव शिवणकर यांची निवड झाली. यानिमित्त क.भा. पाटील बागणी विद्यालयातर्फे मुख्याध्यापक वाय. डी. के सारे, प्रा. तानाजीराव कदमबांडे, अजित हेरवाडे, बबन महाजन, हणमंत शिताफे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना केसरे म्हणाले, डॉ. शिवणकर यांचे काम चांगले आहे. संस्थेत ते गेली कित्येक वर्षे झाली काम करत आहेत. त्यांना मोठा अनुभव आहे. त्यांची निवड ही योग्य आहे. शरद पवार यांनी युवकांना संधी देत संस्थेच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. शिक्षण संस्थेच्यावतीने विविध उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले. डॉ. शिवणकर हे देखील आगामी काळात मिळालेल्या संधीचे सोने करतील. ग्रामीण भागातील शाळांवर देखील त्यांचे विशेष लक्ष राहील यात शंका नाही असे प्रतिपादन केसरे यांनी केले.

अॅॅड. आर.आर. पाटील खरेदी विक्री संघात मका खरेदीस सुरवात


अॅॅड. आर.आर. पाटील खरेदी विक्री संघात मका खरेदीस सुरवात

तासगाव : तासगाव येथील अॅड.आर.आर. पाटील शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ मर्या, तासगाव मार्केट यार्ड तासगाव दि. महाराष्ट्र स्टेट को ऑप. मार्केटिंग फेडरेशन लि. यांचे सब एजंट म्हणून २९ जूनपासून सुरू करण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अजितराव जाधव यांच्या हस्ते खरेदी केंद्राचे उदघाटन झाले.
या खरेदी विक्री संघात सन.२०१९-२० शासन आधारभूत किंमत योजनेतंर्गत मका खरेदीस सुरवात करण्यात आली. मार्केटला मका दर कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ लागले आहे. शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा, या उद्देशाने शासनाच्यावतीने माल खरेदी केंद्र सुरु झाले. शेतकऱ्यांनी सर्व प्रथम आपले नाव नोंदणी करावी. त्यानं माल खरेदी केला जाणार आहे शेतकऱ्यांनी आपली नावे नों द करण्यासाठी ७/१२, खाते उतारा पीकपाणी नोंद (१९.२० रब्बी मका) आधार कार्ड, बँक पासबुक पहिल्या पानाचे झेरॉक्स आदीसह माहिती घेऊन नाव नोंद करावे. त्यानंतरच माल स्विकारण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी संघाचे अध्यक्ष विलास वामन पाटील, उपाध्यक्ष तानाजीराव तात्या घाटगे, संचालक अमोल संपतराव पाटील, विलास आनंदा पाटील, वसंत तुकाराम पाटील, वेअर हाऊसचे धुमाळ, मार्केट कमिटी संचालक विवेक शेंडगे, बाळासाहेब गुरव, संघाचे व्यवस्थापक सगरे आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इस्लामपुरात किरकोळ कारणावरून गुंडाचा खून


इस्लामपुरात किरकोळ कारणावरून गुंडाचा खून

इस्लामपूर : किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणातून निनाईनगरमध्ये रात्री येथे संतोष कदम या पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून झाला आहे. याप्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यात अजित हेमंत पाटील, सुरज पांड्या, प्रतिक पाटील यांच्यासह सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर मारेकरी पसार झाले असून अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
संतोष कदमवर काही महिन्यापुर्वी मोका अंतर्गत कारवाई झाली होती.सध्या जामिनावर तो बाहेर होता. काल रविवारी (ता. २८) रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास सहा जणांनी त्याला बेदम मारहाण केली होती. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच तो मृत झाला.
अजित पाटील आणि संतोष कदम या दोघांच्यात येथील बहे नाक्यावर किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली होती. त्याचे पर्यवसान भांडणात झाले. वादावादीनंतर घरी गेलेल्या अजित पाटीलने नंतर सोबत काहीजणांना घेऊन निनाईनगर येथे जाऊन संतोष कदमला बेदम मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झालेल्या कदमवर उपचार सुरू असतानाच त्याचे निधन झाले. पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी सांगितले.

सांगलीच्या कुपवाड मध्ये पूर्व वैमनस्यातून खुनी हल्ला


सांगलीच्या कुपवाड मध्ये पूर्व वैमनस्यातून खुनी हल्ला

सांगली : पूर्ववैम नस्यातून विकास गुड्डाप्पा मोरे (वय ३५, पंढरपूर रस्ता, बाबुराव मोरेनगर, मिरज) याच्यावर लोखंडी रॉड आणि काठीने खुनी हल्ला केल्याचा प्रकार कुपवाड मधील एमएसईबी रस्त्यावरील मधुसूदन डेअरीजवळ घडला. याप्रकरणी कुबेर राजपूत (मेंढे मळा, मिरज), दीपक पाटील (रा. मिरज), दीपक रामचंद्र जाधव (वय ३८, दत्त कॉलनी पश्चिम, मिरज), रवींद्र रामा कांबळे (वय ३८, इंदिरानगर, म्हाडा, मिरज) आणि अनोळखी साथीदारांविरूद्ध कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दीपक जाधव व रवींद्र कांबळे या दोघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की विकास मोरे आणि कुबेर राजपूत यांच्या यापूर्वी वाद झाला होता. विकास हा शनिवारी सकाळी मोपेड (एमएच १० डीई २६२) वरून घरी निघाला होता. कुपवाडमधील एमएसईबी रस्त्यावरील मधुसूदन डेअरीजवळ तो आला असताना कुबेर राजपूत आणि इतर अकरा जणांनी पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून विकासच्या दुचाकीला पाठीमागून धडक देऊन खाली पाडले. तेव्हा कुबेर याने त्याला तुला जीवंत ठेवत नाही' असे म्हणत हातातील लोखंडी रॉडने, दीपक पाटील याने काठीने मारहाण करण्यास सुरवात केली. तसेच इतर साथीदारांनी देखील विकासला मारहाण केली.
खुनी हल्ल्यानंतर कुबेर आणि साथीदार तेथून पसार झाले. जखमी विकास याने उपचार घेतल्यानंतर कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात कुबेर आणि साथीदारांविरूद्ध फिर्याद दिली. त्यानुसार संशयित हल्लेखोरांविरूद्ध खुनी हल्ला केल्याबद्दल गुन्हा नोंदवला आहे. तसेच त्यापैकी दीपक जाधव आणि रवींद्र कांबळे या दोघांना अटक केली आहे. इतर हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.
दरम्यान संशयित हल्लेखोरांपैकी एकाच्या नातेवाईक महिलेने जखमी विकास मोरे व अम ल मोरे (रा. मिरज) या दोघांविरुद्ध विनयभंग केल्याची फिर्याद दिली आहे. शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास मिरज एमआयडीसीजवळील अमित हेल्पलाईन सलाईन फॅक्टरीजवळ दोघांनी दुचाकीवरून येऊन हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार विकास व अमोल विरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आजचे राशिभविष्य : मंगळवार, दि. ३० जून २०२०



आजचे राशिभविष्य : मंगळवार, दि. ३० जून २०२०

मेष :

नवीन जोखिम असलेली कार्ये टाळा. आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये. आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल होकारात्मक दृष्टीकोण प्रदर्शित करा.

वृषभ :

नवीन जोखिम असलेली कार्ये टाळा. आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये. आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल होकारात्मक दृष्टीकोण प्रदर्शित करा.

मिथुन :

आपल्या मित्रांना रात्रीचे जेवण आणि नृत्यासाठी बाहेर घेऊन जाण्यापूर्वी विचार करा. कार्यात यश मिळविण्यासाठी आपले मत ठामपणे मांडा. इतर लोकांबरोबर काही विषयांवर संमती द्यावी लागू शकते. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील.

कर्क :

मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. नोकरदार व्यक्तींना कामात अनुकूल वातावरण मिळेल. मित्रांचा पाठिंबा मिळेल. पत्नीशी बोलल्यानंतर मूड छान होईल. आपली इच्छा असेल तर दिवास्वप्नही खरी ठरू शकतात.

सिंह :

आपणास आज संभाषणात काळजी घेण्याची गरज आहे. धावपळ जास्त होईल. देवाण-घेवाण टाळा. वेळ अनुकूल आहे. व्यापार-व्यवसायासाठी छान दिवस. कुटुंबाबरोबर आज घालवलेले आनंददायी क्षण आयुष्यभर स्मरणात रहातील.

कन्या :

स्वतःला इतर लोकांसमोर सादर करण्याचे सामर्थ्य अंगी येईल. इतर लोकांना तुमचे वचार पटतील. महत्वाच्या एखाद्या सामुदायिक योजनेत इतर लोकांबरोबर आपले सहकार्य तुमची उत्तम राजकीय जाण दाखवेल. अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल.

तूळ :

आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती आनंददायी राहील. अधिकार क्षेत्र वाढेल. शत्रूंना भीती वाटेल. आनंद वाढेल. उत्साहजनक वार्ता मिळतील. लेखन कार्यात प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील.

वृश्चिक :

देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक. वाहने काळजीपूर्वक चालवा. शत्रूंपासून सावध राहा. मित्रांच्या सहयोगाने कार्यांमध्ये सहजपणा राहील. शत्रूंवर प्रभाव वाढेल.

धनु :

मुलांवर खर्च होईल. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. वेळेचे भान पाळा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. खर्च वाढेल. महत्त्वाच्या कामांमध्ये सावधगिरी बाळगा. आपली सर्व कामे योग्य वेळी पूर्ण करण्यासाठी आज आपण गंभीर विचार करू शकता.

मकर :

इच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील. शेअरमध्ये गुंतवणूक करू नका. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. आरोग्य देखील चांगले राहील.

कुंभ :

हसत खेळत दिवस जाईल. आर्थिक स्थिती संमिश्र राहील. कुटुंबातही वेळ चांगला जाईल. वरिष्ठ लोकांचे कामात सहकार्य मिळेल. अधिकारी आपणास सहकार्य करतील. विरोधक पराभूत होतील. आरोग्याचा त्रास होऊ शकतो. व्यापार-व्यवसायात जोखमीचे कार्य टाळा.

मीन :

देवाण-घेवाणीबाबत काळजीपूर्वक व्यवहार करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक. वाहने काळजीपूर्वक चालवा. शत्रूंपासून सावध राहा. स्थिती अनुकूल राहील. दिवस उत्तम राहील. महत्वाच्या कार्यात यश मिळेल.

मणक्याच्या आजारासाठी आयुर्वेदिक उपाय


मणक्याच्या आजारासाठी आयुर्वेदिक उपाय

आजच्या जीवनशैलीची नवीन देणगी म्हणून आढळून येणारा आजार म्हणजे मानेच्या व कमरेच्या मणक्यांचा आजार. धावपळीचे जग, सतत कामानिमित्त करावा लागणारा प्रवास, दूरदूर शाळा-कॉलेज यामुळे प्रवास. व्यवसायामुळे सतत कॉम्प्युटरवर काम करणे इत्यादी अनेक कारणांमुळे आपणास हे आजार आढळतात.

कारणे :

* व्यायामाचा अभाव
* काम करताना नीट न बसणे
* पुढे वाकून बसण्याची सवय
* चालताना पाठ सरळ न ठेवणे
* सतत मान वर करून टीव्ही बघणे
* अधिक काळ प्रवास करणे, वाहन चालवणे
* कसेही ओझे उचलणे रक्तक्षयामुळे
* खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी. उदा. नेहमी नेहमी पिझ्झा, वडापाव, चायनीज यासारखे पोषण न करणारे खाद्यपदार्थ खाणे
* शरीराला मालीश व सूर्यस्नान करण्याचा अभाव

लक्षणे :

* मानेच्या व कमरेच्या हाडांमधील रचनेची झीज होते. यामध्ये मुख्यत: करून दोन मणक्यातील असणारी गादीची झीज.
* मणक्यात गॅप होणे
* मणक्यातील गादी सरकणे
* हाड सरकणे, मुंग्या येणे, हात-पाय बधिर वाटणे, चक्कर येणे, चालताना त्रास होणे, हाताने वस्तू उचलता न येणे, पायाने लंगडत चालणे इत्यादी उत्पन्न होतात.

निदान करण्यासाठी  x - ray r c.t. scan, m.r.i करावे .

उपाय : 

* पाठीचे व पोटाचे व्यायाम हा सर्वात उत्तम उपाय
* योगासणे (तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने) यात मुख्यत: शलआसन, नौकासन, धनुशासन, भुजंगासन इत्यादी.
* पाठीचा कणा ताठ ठेवून बसणे, खुर्चीतून दर अर्ध्या तासाने उठून चक्कर मारणे
* याशिवाय आयुर्वेदात सांगितलेली पंचकर्मे केल्यास झीज कमी होते. यामध्ये मुख्यत: अभ्यंग, पिंडस्वेद, पत्रफेडरली स्वेद या केरळीयन मसाज पद्धतीमुळे पाठीचे व मानेचे स्नायू मजबूत होतात व दुखणे कमी होते.
* मण्याबस्ती व कटिबस्ती या विशिष्ट पंचकर्माने दुखणे कमी होते. * शिवाय बस्ती व नस्य या पंचकर्माने शरीरातून हाडांची, नसांची सुज व झीज कमी होते.
* विशिष्ट प्रकारच्या बस्तीने ‘ऑस्टिओपोरोसीस’ चा त्रास कमी होतो.

या पंचकर्माने शरीरातील अस्थी व मज्जा धातूंचे पोषण होते व आवश्यक जीवनसत्त्वे शोषण घेण्यास मदत होते. पार्श्वनाथ आयुर्वेद पंचकर्म रिसर्च सेंटर येथे होत असलेल्या रिसर्चने हे सिद्ध झाले आहे. मानेचा व कमरेचा योग्य पट्टा स्पोर्ट म्हणून वापरावा. मन शांत ठेवावे नाही तर मानेचे, पाठीचे स्नायू ताठरतात. एसी किंवा फॅनखाली झोपू नये. वेदनेकडे लक्ष न ठेवता दीर्घ स्वास घ्या व हळूहळू सोडा, ध्यानधारणा करा. या उपाययोजनेनेही दुखणे कमी होते. शरीराला तिळाच्या तेलाने नियमित मालीश करावी व सूर्यस्नान घ्यावे.

सुखाची निद्रा कशी घ्याल?

सुखाची निद्रा कशी घ्याल?

रोज प्रत्येकाला रात्री काही विशिष्ट काळापर्यंत गाढ झोप लागलीच पाहिजे. जे काही कारणास्तव रात्री जागरण करतात त्यांच्या त्रिदोषाचे असंतुलन होऊन वात दोषाचे आधिक्य निर्माण होते. त्यामुळे सर्व अंग दुखणे, अस्वस्थ वाटणे, आम्लपित्ताचा त्रास होणे, डोळ्याखाली काही वर्तूळ निर्माण होणे. काम करण्याचा उत्साह नसणे, कुठल्याही कार्याचे पूर्णत-हेने आकलन न होणे, अशी अनेक लक्षणे अनिद्रेमुळे उद्भवतात. रात्री किती झोप घ्यायला हवी? खरं तर हा ज्याचा त्याचा प्रश्न होय.

झोप लागलीच पाहिजे.

रात्र रात्र झोप न येणार्‍यास विचारा निद्रादेवीस प्रसन्न करणे किती कठीण असते. गादीवर पडल्या पडल्या एखाद्या पुस्तकाच्या दोन चार ओळी वाचल्या न वाचल्या तर झाले झोपच्या आधीन. अहाहा! हे निद्रासुख होय. ज्यांना ते भेटते त्यांना त्याचे महत्त्व वाटणार नाही, पण हे सुख काय आहे याचे वर्णन रात्री जागणार्‍यांना विचारा. आयुर्वेदात त्रयोस्तंभ वर्णन केले आहे. त्यापैकी एक म्हणजे निद्रा होय. रोज प्रत्येकाला रात्री काही विशिष्ट काळापर्यंत गाढ झोप लागलीच पाहिजे. जे काही कारणास्तव रात्री जागरण करतात त्यांच्या त्रिदोषाचे असंतुलन होऊन वात दोषाचे आधिक्य निर्माण होते. त्यामुळे सर्व अंग दुखणे, अस्वस्थ वाटणे, पाय, पिंडर्‍या दुखणे, अम्लपित्ताचा त्रास होणे, त्वचा कोरडी निस्तेज होणे, केस गळणे, डोळ्याखाली काही वर्तूळ निर्माण होणे. शौचास साफ न होणे, भूक मंदावणे, काम करण्याचा उत्साह नसणे, डोळे जड वाटणे, डोळे जळजळ करणे, कुठल्याही कार्याचे पूर्णतºहेने आकलन न होणे, अशी अनेक लक्षणे अनिद्रेमुळे उद्भवतात. रात्री किती झोप घ्यायला हवी? खरं तर हा ज्याचा त्याचा प्रश्न होय. तरी आयुर्वेदाच्या दृष्टिकोनाने ज्या झोपेमुळे सकाळी उठल्यावर ताजेतवाने वाटते, उठल्यानंतर कुठल्याही प्रकारची मरगळ राहत नाही. शरीर हलके वाटते. डोळे, डोके जड वाटत नाही. जी झोप स्वत:हून पूर्ण होऊन मनुष्यास जागृत करते, अशा झोपेस सामान्य झोप म्हणता येईल. रात्री लवकर म्हणजे नऊ ते दहा वाजेपर्यंत मनुष्याने निद्राधीन व्हायला हवे. तर सकाळी म्हणजे 3 ते 4 वाजेपर्यंत उठायला हवे. रात्रीचे जेवण व झोप यामध्ये कमीत कमी दोन तासाचा कालावधी असायला हवा. हा आयुर्वेदिक सिद्धांत.

हितकर आहार, भरपूर श्रम, व्यायामाचा अवलंब

एखाद्या मजुराच्या जीवनाकडे पाहिले तर कुण्याही रात्रंपाळी करणार्‍या मनुष्यास हेवा वाटेल. दिवसभर राबराब राबून धोंड्यावरसुद्धा गाढ झोप येईल. आपण दिवसभर योग्य दिनचर्येचे पालन केल्यास, योग्य हितकर आहार सेवन केल्यास आणि भरपूर श्रम केल्यास, व्यायामाचा अवलंब केल्यास, सुख- दु:खाची तमा न बाळगल्यास अंथरुणावर लवंडलो की पापण्या जड होऊन डोळे झोपेसाठी पटकन मिटतील व आपणास कळणारही नाही. हे वरील सर्व उपाय अमलात आणल्यानंतरसुद्धा आपणास समाधानकारक झोप येत नसल्यास झोपेची गोळी घेण्यापेक्षा आपण काही आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा अवलंब करून घ्यावा. त्यात विशेषत: स्नेहन, स्वेदन आणि शिरोधारा याचा आपणास फायदा होतो. स्नेहन म्हणजे काही विशिष्ट आयुर्वेदिक तेलाने पूर्ण शरीराला प्रावीण्य असणार्‍यांकडून मालीश करून घ्यावी. व नंतर सर्वांगाला आयुर्वेदिक औषधाने सिद्ध काढण्याची वाफ दिली जाते. त्यामुळे शरीरास लाघवता प्राप्त होते. दोषाचे निर्मूलन होऊन झोप येण्यास मदत होते. तसेच शिरोधारा यामध्ये कपालभागी औषधी सिद्ध तेलाची धारा 30-35 मिनिटांपर्यंत सोडण्यात येते. नंतर डोक्याची मालीश केली जाते. कित्येकदा असा अनुभव येतो की रुग्णांना शिरोधारा करता करताच झोप लागून जाते. मग आज रात्री झोप न आल्यास वरील उपायांनी करणार का निद्रादेवीची आराधना?

झोप येत नाही त्यासाठी काही साधे व सोपे उपाय

रोज रात्री तळपायाची एरंड तेलाने दहा मिनिटांपर्यंत मालीश करावी.
अथवा काशाच्या वाटीने गायीचे तूप तळपायांना घासून लावावे. यामुळे झोप तर शांत येईलच सोबत मस्तकाची आगही शांत होईल.
डोक्याला ब्राह्मी वा माक्याने सिद्ध केलेले तेल लावून चांगली मालीश करावी.
रात्री झोपताना एक मोठा ग्लास म्हशीचे दूध साखर व वेलदोडा टाकून प्यावे.
सुमधुर व सौम्य संगीत ऐकत ऐकत झोपेच्या अधीन व्हावे.
चांगले दर्जेदार साहित्य वाचनाची सवय झोपताना लावावी.
दिवसा प्रात:काळी लवकर उठावे व नंतर दिवसा झोप घेऊ नये.
झोपताना आपल्या श्वासगतीकडे लक्ष देऊन शवासन साधून मग गाढ झोपेत जाण्याचा प्रयत्न करावा.
जीवनात आपणास भेटत असणारे सुख दु:ख यांना कुणालाही जबाबदार धरू नये.
सुखाने हुरळून जाऊ नये वा दु:खाने खचून जाऊ नये. कुठलीही परिस्थिती एक सारखी राहत नाही. त्यामुळे आशावादी राहा, तणाव मुक्त राहा. सकारात्मक विचारधारा असू द्या. निश्चितच रात्रीच्या झोपेचा आनंद मिळेल.

व्यसन सोडायचे घरगुती उपाय!


व्यसन सोडायचे घरगुती उपाय!

1  1.    सफरचंदाचा रस वेळोवेळी पिल्याने तसेच जेवनात सेफचा उपयोग केल्याने दारू पिण्याची सवय सुटते. 
2. 
उकडलेले सफरचंद दिवसातून तीन- चारदा सेवन केल्याने दारूची सवय सुटते.
3. 
एका हळदीचे बारीक-बारीक तुकडे करावे जेव्हा पण सिगारेट, तंबाखू खाण्‍याची इच्छा झाली तेव्हा हळदीचे तुकडे तोंडात टाकून आराम चघळावे. काही दिवसात विडी, सिगारेट व तंबाखूची सवय सुटते. 
4. 
सिगारेट सोडण्यासाठी दालचीनीला बारीक वाटून शहदामध्ये टाकून जेव्हा सिगारेट ओढण्याची इच्छा झाला तेव्हा मिश्रण बोटाने चाखावे.
5. 
कांद्याचा रस 25 ग्रॅम दिवसातून एकदा नियमित सेवन केल्यास तंबाखू खाण्‍याची सवय सुटते. 
6. 
चरस, गांजा, दारू यांची कोणालाही जास्त नशा झाली असल्यास 60 ग्रॅम अंगुर वाटून पाण्यासोबत गाळून घ्यावे. यामध्ये कालीमिर्च, जीरे यांची पूड व मीठ टाकून पिण्यास द्यावे. लवकरच दारूची झिंग उतरते.
7. 
एक ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये लींबू पिळावा. हे मिश्रण दिवसातून अनेक वेळा घेतल्याने दारूची नशा कमी होते. 

हळदीच्या दुधाचे फायदे


हळदीच्या दुधाचे फायदे


हळदीच्या दुधाचा सर्वात अधिक फायदा हाडांना होतो. दररोज हळदीचे दुध पिल्याने शरीराला पर्याप्त मात्रेमध्ये कॅल्शियम मिळते. हाडे स्वस्थ आणि मजबूत होतात. ऑस्टियोपोरेसिस च्या रुग्णांना यामुळे नक्कीच आराम पडतो.

हळदीचे दुध हे गठीया रोग दूर करण्यास मदत करते. गठीया रोगाचे निदान आणि रियूमेटॉइड गठिया मुळे आलेली सूज यावर हळदीचे दुध गुणकारी आहे. याशिवाय सांधे आणि मांसपेशीना लवचिक बनवून दुखणे कमी करण्यास हळदीचे दुध मदत करते.

आयुर्वेदामध्ये हळदीच्या दुधाचा उपयोग शोधन क्रियेमध्ये केला जातो. हळदीचे दुध शरीरातील रक्तातून टॉक्सिन्स काढून टाकण्यास मदत करते. त्याचबरोबर लिव्हरचीही स्वच्छता करते. पोटाच्या बहुतांश रोगावर हळदीचे दुध पिणे फायदेशीर आहे.

ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते राजाराम लिमये यांचे वृद्धापकाळाने निधन

ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते राजाराम लिमये यांचे वृद्धापकाळाने निधन

सांगली : सांगली शहरातील ज्येष्ठ वृत्तपत्र वितरक (विक्रेते) राजाराम पुरुषोत्तम लिमये (वय ७८ ) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. पन्नास वर्षांपूर्वीपासून वृत्तपत्र व मासिके वितरक म्हणून काम केले.वृत्तपत्र विक्रेत्यांच्या विविध प्रश्नासाठी व प्रगतीसाठी संघटनेसाठी योगदान दिले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे जुन्या पिढीतील रा स्व संघाचे ते कार्यकर्ते होते. वृत्तपत्र वितरक, जाहिरात व्यवसायिक भालचंद्र लिमये यांचे ते वडिल होत.

शिरोळ तालुक्यातील हरोली येथे वायरमन चा मृत्यू : जोडणीचे काम करत असताना घडली दुर्घटना


शिरोळ तालुक्यातील हरोली येथे वायरमन चा मृत्यू : जोडणीचे काम करत असताना घडली दुर्घटना
तरुण वायरमनचा दुर्दैवी अंत : परिसरात हळहळ


कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्या च्या शिरोळ तालुक्यातील हरोली येथे विजेच्या धक्‍क्‍याने वायरमन चा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडलीय. सौरभ कांबळे वय वर्षे 25असे या वायरमन चे नाव आहे. तो सहकारी जगताप यांच्यासह एका शेतात जोडनीचे काम करण्यासाठी गेला होता. जोडणी करण्यासाठी खांबावर चढून जोडणी करत असताना त्याला अचानक विजेचा झटका बसला. या झटक्याने तो जागीच मरण पावला.

तरुण वायरमन चां असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सांगली महापालिकेची आपत्ती व्यवस्थापन तयारीची प्रबोधन फेरी: आपत्कालीन वाहनासहीत सांगली मिरजेतून निघाली प्रबोधन फेरी


सांगली महापालिकेची आपत्ती व्यवस्थापन तयारीची प्रबोधन फेरी: आपत्कालीन वाहनासहीत सांगली मिरजेतून निघाली प्रबोधन फेरी

सांगली : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशानुसार आज आपत्ती व्यवस्थापन विभागांतर्फे प्रबोधन फेरी काढण्यात आली.
महापुराच्या पार्श्वभूमीवर संभाव्य आपत्ती, सुरक्षा, बचाव आणि सुटका पथकाची तयारी दर्शवण्यासाठी तसेच त्यासाठी सज्ज असलेली सर्व साधन सामुग्री/यंत्रणा आणि आपत्ती मित्र यांच्यासह प्रबोधन फेरी काढण्यात आली. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी या प्रबोधन फेरीचे नेतृत्व केले.
मिरज शहरातून सुरू झालेली ही रॅली सांगली मिरज रोडवरून सांगली शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. याशिवाय येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर आपत्कालीन साहित्य आणि तयारीची प्रत्यक्षिकेही यावेळी सादर करण्यात आली.

सांगलीच्या प्रभाग १६ मधील पोलीस वसाहतींची दुरुस्ती करा, तुरुंग अन्यत्र स्थलांतरित करा : नगरसेविका सौ. स्वाती शिंदे यांची गृह्मंत्र्याकडे मागणी

सांगलीच्या प्रभाग १६ मधील पोलीस वसाहतींची दुरुस्ती करा, तुरुंग अन्यत्र स्थलांतरित करा : नगरसेविका सौ. स्वाती शिंदे यांची गृह्मंत्र्याकडे मागणी


सांगली : सांगली, मिरज कुपवाड शहर महानगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक १६ मधील नगरसेविका सौ स्वाती शिंदे यांनी गृहमंत्री,मा.नामदार अनिल देशमुख यांच्याकडे प्रभागातील पोलिस वसाहतींची दुरुस्ती करावी तसेच याच प्रभागातील कारागृहाचे स्थलांतर क रावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग 16 मध्ये सुमारे 100 वर्षापूर्वी बांधलेल्या पोलीस वसाहती आहेत. त्यांची सध्या प्रचंड दुरावस्था झाली आहे. मागील वर्षीच्या महापुरामुळे तर या वसाहतींची वाताहत झाली आहे. घरादाराची पर्वा न करता कोरोना शी 24 तास लढणाऱ्या पोलिसांना अत्यंत धोकादायक आणि गलिच्छ वातावरणात राहावे लागत आहे. त्यामुळे तातडीने या प्रश्न इ लक्ष घालून पोलीस वसाहतींच्या दुरुस्तीसाठी व नव्याने बांधणी करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे आदेश द्यावेत आणि आणि निधीची देखील तरतूद करून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.


त्याचबरोबर याच प्रभागातील जिल्हा मध्यवर्ती कारागृह हेही संस्थानकालीन असून क्षमतेपेक्षा जास्त कैदी या कारागृहांमध्ये असतात.अत्यंत दाट लोकवस्तीच्या परिसरात शहराच्या मध्यवस्तीत हे कारागृह असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कैद्यांना राजवाडा परिसरातील शाळांमध्ये ठेवण्यात आले आहे.कोरोनाची साथ जर वाढली आणि कारागृहामध्ये कोरोनाचा फैलाव झाला तर कारागृह व शाळेतील कैद्यांमुळे संपूर्ण परिसरात कोरोनाचा फैलाव होऊ शकतो.

ऑगस्ट 2019 मध्ये आलेल्या महापुरा मध्ये देखील कारागृह परिसरामध्ये आठ ते नऊ फूट पाणी आल्याने कैद्यांचे स्थलांतर करावे लागले होते.त्यामुळे अधिक कैद्यांची क्षमता असणारे नवे कारागृह बांधण्यासाठी नव्या जागेचा शोध घेऊन निधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.तरी याबाबत देखील आपण आवश्यक ते आदेश द्यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

विश्रामबाग रेल्वे फाटका जवळील १७ खोकी धारकांचे तातडीने पुनर्वसन करा : शिवसेनेतर्फे मागणी

विश्रामबाग रेल्वे फाटका जवळील १७ खोकी धारकांचे तातडीने पुनर्वसन करा : शिवसेनेतर्फे मागणी

सांगली : सांगली शहरातील विश्रामबाग येथील रेल्वे फाटक जवळ असलेल्या १७ खोकी धारकांच पुनर्वसन करण्याबाबत आयुक्तांन शिवसेनेतर्फे निवेदन देण्यात आले.


यावेळी शिवसेना शहर प्रमुख महेंद्र चंडाळे म्हणाले की वारणाली रेल्वे फाटक येथे झालेल्या उड्डाणपूलामुळे बाधित झालेले खोकी तारक त्यांचे पुनर्वसन मंगळवार बाजार पेठत करण्यात आले आहे. परंतु त्यापैकी उर्वरित १७ खोकी धारक त्यांचे पुनर्वसन इतर ठिकाणी करून घेण्याचे ठरले होते त्याप्रमाणे त्यांच्याकडून महापालिकेची सर्व फी घेण्यात आली व भरून आरसीसी खोके बांधून देण्यासाठी लागणारी रक्कम रुपये ६०, हजार रुपये ते ही कॉन्ट्रॅक्टर कडे भरून घेण्यात आले.परंतु ३ वर्ष होऊन गेले अद्याप या लोकांचे पुनर्वसन झाले नाही.


सध्या त्यामुळे त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची बनल्यामुळे बेरोजगारी व उपासमारीमुळे अत्यंत दैनिय परिस्थिती झाली आहे, वारंवार आयुक्तांना निवेदने देण्यात आली आहे तरी सुद्धा यावर अजून कोणता निर्णय घेण्यात आला नाही म्हणून येत्या ७ दिवसाच्या आत निर्णय न झालेस येत्या तीन जुलै रोजी पासून लक्षणीय आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी शंभूराज काटकर, संदीप ताटे,सनत पाटील, मनोज जाधव, दादा जगताप, अभिजित सावत, बापू लोहार उपस्थित होते.

सांगली शहरात नव्याने कोरोना दाखल : सिव्हील मधील ब्रदर कोरोना ग्रस्त : जिल्ह्यात १९ रूग्ण वाढले


सांगली शहरात नव्याने कोरोना दाखल : सिव्हील मधील ब्रदर कोरोना ग्रस्त : जिल्ह्यात १९ रूग्ण वाढले

सांगली : रविवारी सांगली जिल्ह्यात १९ रूग्ण वाढले आहेत. तर ५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण रुग्ण संख्या ३५८ वर पोहचली आहे. तर उपचारातील रूग्णसंख्या १२० झाली आहे. आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू तर ३ चिंताजनक आहेत. शिराळा खुर्द या गावातच नऊ रुग्ण आढळून आल्याने हे गावही आता कोरोना हॉटस्पॉट बनले आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय साळुंखे यांनी दिली.

सांगलीतील वसंतदादा सर्वोपचार रूग्णालयातील अस्थिव्यंग विभागात कार्यरत असणारा ब्रदर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तर तपासणी नंतर त्याचा सहकारी ब्रदरही पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यामुळे सांगली शहरातील रूग्णसंख्या आणखीन एकाने वाढली आहे. हे दोघे ब्रदर सम्राट व्यायाम मंडळाजवळ एकाच रूममध्ये राहत होते.



शिराळा तालुक्यातील शिराळे खुर्द येथे नऊ रूग्ण वाढले आहेत. यामध्ये ४५ वर्षाची महिला, ३० वर्षाची महिला, १९ वर्षाची मुलगी, ३५ वर्षाची महिला, १४ वर्षाचा मुलगा, १६ वर्षाचा मुलगा, २८ वर्षाची व्यक्ती, ४५ वर्षाची व्यक्ती आणि ८७ वर्षाची व्यक्ती असे नऊ रूग्ण वाढले आहेत. एकाच कुटुंबांशी संपर्कातील या व्यक्ती आहेत. शिराळे खुर्द हे गाव आता जिल्ह्यातील दुसरे कोरोना हॉटस्पॉट बनले आहे. शिराळा तालुक्यातील मणदूर या गावानंतर शिराळे खुर्द या गावात रूग्ण संख्या वेगाने वाढत चालली आहे.

दुधोंडी, पुणदी, कोकरूड, बिळूर, बावची येथे रूग्ण वाढले पलूस तालुक्यातील धोंडी येथील त्या राजकीय नेत्यांच्या संपतिील ४६ वर्षाची व्यक्तीही पॉझिटिव्ह आली आहे. पुणदी येथील ३५ वर्षीय व्यक्तीही तसेच जत तालुक्यातील बिळूर येथील ४५ वर्षीय व्यक्ती, तासगाव तालुक्यातील वाघापूर येथील २२ वर्षीय महिला, वाळवा तालुक्यातील बावची येथील २४ वर्षीय युवक पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तर शिराळा तालुक्यातील कोकरूड येथील ३० वर्षीय महिला आणि ११ वर्षाचा मुलगा तसेच ढाणेवाडी येथील ६० वर्षीय व्यक्ती, निगडी येथील २४ वर्षीय महिला असे एकण १९ जणांचे अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आले आहेत. या सर्वांच्यावर मिरजेच्या कोरोना रूग्णालयात उपचार सुरू कर ण्यात आले आहेत.


रविवारी पाच जण कोरोना मुक्त झाले आहेत. त्यामध्ये पलूस येथील ८८ वर्षीय व्यक्ती, ६७ वर्षीय महिला, शिराळा तालुक्यातील पुणदी येथील ८५ वर्षाची महिला, खानापूर तालुक्यातील भाळवणी येथील ६ वर्षीय महिला आणि जत तालुक्यातील निगडी येथील ३८ वर्षीय व्यक्ती असे एकूण पाच जण कोरोना मुक्त झाले आहेत.

आयुष्यभर रुग्ण सेवा करणाऱ्या परिचारिकेची मृत्युनंतर परवड : नातेवाईकांना सोसावा लागला नाहक मनःस्ताप


आयुष्यभर रुग्ण सेवा करणाऱ्या परिचारिकेची मृत्युनंतर परवड : नातेवाईकांना सोसावा लागला नाहक मनःस्ताप


सांगली सिव्हिलमध्ये परिचारिकेचे काम करणाऱ्या एका परिचारिकेचा अकस्मात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. मिरज येथील गवळी कट्टा परिसरात राहणाऱ्या या परिचारिकेचा शनिवारी रात्री अकस्मात मृत्यू झाला. संबंधित परिचारकेने मिरजेतील कोरोनाबाधित डॉक्टरांच्या रुग्णालयात उपचार घेतले असल्याने परिसरातील नागरिकांच्या मागणीवरुन मृतदेह कोविड तपासणीसाठी मिरज सिव्हीलमध्ये पाठविण्यात आला होता. 

सांगलीच्या शासकीय रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करणाऱ्या ५८ वर्षीय महिलेस श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यांत आले होते. उपचारानंतर आठवड्यापूर्वी संबंधित महिलेस घरी पाठविण्यात आले. शनिवारी रात्री महिलेचा घरात आकस्मित मृत्यू झाला. महिलेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाली असल्याने शेजाऱ्यांनी मृत महिलेची कोरोना तपासणी केल्याशिवाय अंत्यसंस्कार करण्यास विरोध केला. यामुलेल महापालिका प्रशासनाने महिलेचा मृतदेह कोविड तपासणीसाठी मिरज सिव्हील मध्ये पाठविला. 

तपासणी अहवाल आल्यानंतच मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यांत येणार असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. कोविड तपासणीसाठी पीपीई किट नसल्याने रात्री उशिरापर्यंत महापालिकेची शववाहिका मिळाली नाही. मृताच्या नातेवाईकांनी तहसीलदारांशी संपर्क साधल्यानंतर मिरज सिव्हिल मधून पीपीई किट व बॉडी किट उपलब्ध  झाले. नातेवाइकांनी पीपीइ किट आणल्यानंतर मध्यरात्री उशिरा महिलेचा मृतदेह सिव्हीलमध्ये नेण्यात आला. अनेक वर्षे रुग्णसेवा करणाऱ्या परिचारिकेच्या मृत्यूनंतर नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागल्याने संताप व्यक्त होत आहे.

सोलापुरात रविवारी तब्बल ७६ नवे कोरोना रुग्ण : मृत्यूची संख्या झाली २४५


सोलापुरात रविवारी तब्बल ७६ नवे कोरोना रुग्ण : मृत्यूची संख्या झाली २४५

सोलापूर : सोलापूर शहरात रविवारी 76 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून त्यापैकी सात जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता मृत्यूची संख्या 245 झाली आहे. रुग्णसंख्येच्या तुलनेत सोलापुरातील मृत्यूदराचे प्रमाण राज्यात अव्वलच आहे. सोलापुरात आतापर्यंत दोन हजार 217 व्यक्‍तींना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी एक हजार 166 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मात्र, रविवारी 33 जणांना घरी सोडण्यात आले असून सद्यस्थितीत 806 रुग्णांवर विविध दवाखान्यांमध्ये उपचार सुरु आहेत. सोलापुरातील सात कोरोना पॉझिटिव्ह व्यक्‍तींचा रविवारी कोरोनामुळे मृत्यू झाला असून सातही रुग्ण 65 वर्षांवरील आहेत. त्यामध्ये साई विहार सोसायटी, कुमठा नाका येथील 65 वर्षीय महिला, दर्शना अर्पाटमेंट, श्रध्दानंद तालिमजवळील 65 वर्षीय पुरुष, माऊली कॉम्प्लेक्‍स, सळई मारुती मंदिराजवळील 65 वर्षीय पुरुष, दमाणी नगर, लक्ष्मी पेठेतील 83 वर्षीय पुरुष, रामवाडी येथील महापालिका शाळेजवळील 75 वर्षीय पुरुष, पश्‍चिम मंगळवार पेठेतील 65 वर्षीय महिला आणि न्यू तिऱ्हेगाव, फॉरेस्ट येथील 77 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. मृतांपैकी एकाला रविवारी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. तर उर्वरित मृत रुग्णांवर मागील काही दिवसांपासून उपचार सुरु होते.

फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशन पुणे यांच्या वतीने सांगली वृत्तपत्र विक्रेत्यांना मास्क व पावसाळी टोपीचे वाटप

फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशन पुणे यांच्या वतीने सांगली वृत्तपत्र विक्रेत्यांना मास्क व पावसाळी टोपीचे वाटप


फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशन पुणे यांच्या वतीने सांगली वृत्तपत्र विक्रेत्यांना मास्क व पावसाळी टोपीचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना सलग्न सांगली जिल्हा वृत्तपत्र असोसिएशनच्यावतीने विक्रांता एजंट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
व्यवसाय-उद्योजकता या बरोबरच सामाजिक भान जपत विविध सामाजिक उपक्रम राबवणारी फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फौंडेशन पुणे यांच्यावतीने वृत्तपत्र विक्रेत्यांना मदत करण्यात आली.
कोरोनाच्या संकटकाळातही वृत्तपत्रांच्या माध्यमातुन जनतेपर्यंत खऱ्या व वस्तुनिष्ठ बातम्या पोहचवण्याचे काम वृत्तपत्र विक्रेते करीत आहेत. त्यांच्या या कामाचे कौतुक करीत फिनोलेक्स इंडस्ट्रीज ने त्यांना सुरक्षा साधने पुरवली.

यावेळी फिनोलेक्स इंडस्ट्रीज लि.चे सांगली जिल्ह्याचे विक्री व्यवस्थापक शिव शंकर आना व सहव्यवस्थापक श्री परशुराम ओले कर, सांगली जिल्ह्यात फिनोलेक्स कंपनीचे वितरक देसाई मायक्रो इरिगेटर्सचे मालक दीपक भाई देसाई व व्यवस्थापक समीर दोशी, दिवेकर मार्केटिंग असोसिएटसचे मालक धनंजय दिवेकर व सचिन दिवेकर तसेच महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे उपाध्यक्ष विकास सूर्यवंशी, जिल्हा संघटक सचिन चोपडे, शहर जिल्हाध्यक्ष शिवाजी काकडे, कार्याध्यक्ष विशाल रासनकर, खजिनदार दत्तात्रेय सरगर, मनपा क्षेत्र अध्यक्ष सचिन माळी, संघटक सुरेश कांबळे, संजय कांबळे, सांगली शहर अध्यक्ष अमोल साबळे, कुपवाड शहर अध्यक्ष बाळासो पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व विक्रेते उपस्थित होते.

यंदा विठुरायाचे थेट दर्शन नाही : मात्र ऑनलाईन दर्शन २४ तास सुरु राहणार


यंदा विठुरायाचे थेट दर्शन नाही : मात्र ऑनलाईन दर्शन २४ तास सुरु राहणार 

पंढरपूर : विठ्ठल मंदिरामध्ये यंदा थेट जरी दर्शन नसले, तरी ऑनलाईन संकेतस्थळावरुन २४ तास दर्शन मिळणार आहे. २४ जूनपासून आषाढी यात्रा संपेपर्यंत विठ्ठल आणि रुक्मिणी मूर्तीवर नित्योपचार सुरू आहेत. मात्र, वारकऱ्यांना मंदिर आणि परिसरात प्रवेश बंदी असणार आहे. मंदिर समितिच्या संकेतस्थळावर
आनॅ लाइन बुि कं ग करून विठ्ठलाचे दर्शन घेता येणार आहे.
परंपरेप्रमाणे विठोबाचा पलंग काढून चोवीस तासांसाठी मंदिर नित्योपचारासाठी खुले करण्यात आले आहे.  प्रतिवर्षी  आषाढ शद्धु प्रतिपदेला पांडुरंगाचा पलंग काढला जातो. विठोबाला लोड तर रुक्मिणी मातेला तक्क्या 
देण्यात येणार आहे. ऑनलाइन चोवीस तास दर्शन भक्तासाठी सुरू आहे. त्यासाठी आनॅ लाइन बुकिंग करावे लागणार आहे. यंदा कोरोनामुळे भाविकांना दर्शन बंद आहे. प्रथा-परंपरेचा एक भाग म्हणून विठुरायांच्या शेजघरातील पलंग काढून टाकण्यात आला. विठ्ठल आणि रुक्मिणी मातचे नित्योपचार होणार आहेत. त्यामधे
नित्यापूजा, महानैवेद्य, लिंबू पाणी असे नित्योपचार विधी असणार आहेत. हे विधी आषाढी यात्रा
कालावधीत होणार आहेत.
कोरोनामुळे विठ्ठल मंदिर गेल्या चार महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे आषाढी यात्राही रद्द करण्यात आली आहे. मंदिर ३० जूनपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज
औसेकर , कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

सांगली जिल्हा पोलिस दलातर्फे कोरोना योद्धा पोलिसांचा सत्कार : गाफील राहू नका,सतर्क रहा -गृहमंत्री अनिल देशमुख

सांगली जिल्हा पोलिस दलातर्फे कोरोना योद्धा पोलिसांचा सत्कार : गाफील राहू नका,सतर्क रहा -गृहमंत्री अनिल देशमुख


कोरोनाचे संकट वाढत असताना रात्रंदिवस कार्यरत राहत संसर्गाची भिती असतानाही पोलिसांनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. यापुढेही पोलिस दलाची प्रतिमा उंचावण्यासाठी विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी लवकरच आपत्ती सेवा पदकाने पोलिसांना गौरविण्यात येईल, असे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे केले. कोरोनाच्या पार्श्वसभूमीवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार जिल्हा पोलिस दलातर्फे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जलसंपदा आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले.उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप सिंह गिल व अशोक वीरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

गाफील राहू नका

यावेळी बोलताना ना. देशमुख म्हणाले, गेल्या तीन महिन्यापासून पोलीस विभाग, आरोग्य विभाग, संपूर्ण प्रशासन अविरत कार्यरत आहेत, कोरोनाच्या महामारीत संक्रमण रोखण्यासाठी काम करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करून अनलॉक काळात संक्रमणाचा धोका अधिक तीव्र होणार आहे, त्यामुळे गाफील राहू नका, संक्रमण वाढ़ नये यासाठी अधिक सतर्क रहा , असे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.

अनलॉकचा काळ

ते पुढे म्हणाले, लॉकडाऊन काळ संपून अनलॉकचा काळ सुरू झाला आहे. परगावी. परराज्यात गेलेले श्रमिक, मजूर उद्योगधंदे सुरू होऊ लागल्याने पुन्हा येत आहेत. त्यामुळे यंत्रणेवर ताण येणार आहे. त्यासाठी जिल्ह्याची यंत्रणा सज्ज ठेवा, असे सांगून गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. कोविड च्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाने केलेल्या विविधांगी कामामुळे पोलीसांची प्रतिमा सर्वाधिक उंचावली आहे.

कोरोना बाधित पोलीस

या काळात अनेक कर्मचारीही राज्यभरात कोरोना बाधीत झाले आहेत. त्यांना चांगल्या उपचाराच्य सुविधा निर्माण करण्यात आल्या असून एखाद्या कर्मचाऱ्याचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या परिवाराला ६५ लाख रूपयांचे आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच कर्तव्य बजावत असताना पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या सेवानिवृत्तीच्या दिनाकांपर्यंत त्यांचे कुटुंबिय शासकीय निवासस्थान मध्ये राह शकेल, असाही निर्णय घेण्यात आल्याचे सांगून कोरोना काळात चांगली सेवा बजावणाऱ्या ना आपत्ती सेवा पदक देण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

प्रातिनिधिक सत्कार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधीक सत्कार पालकमंत्री जयंत पाटील व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्हा पोलीस दलाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याहस्ते सत्कार होत असल्याबद्दल मनस्वी आनंद होत आहे. पोलीस दल सक्षम करण्याचे, पोलीस दलात सरकार तुमच्या पाठीशी आहे असा विश्वास निर्माण करण्याचे काम गृहमंत्री अनिल देशमुख करत आहेत, याबद्दल त्यांनी प्रशंसा केली.

२४ तास सेवा

पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा म्हणाले, स्वत:ची व स्वत:च्या कुटुंबाची पर्वा न करता सांगली जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी आपत्तीच्या काळात रात्रंदिवस तैनात आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, कंटेनमेंट झोनची अंमलबजावणी, अत्यावश्यक सेवांचा पुरवठा यामध्ये महत्वपूर्ण योगदान जिल्हा पोलीस दलाने दिले आहे.शासनाकडून पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी मास्क, सॅनिटायझरसह पीपीई कीट देण्यात आले. कोरोना संकट काळात सांगली पोलिस दलाने 24 तास सेवा बजावली. जिल्ह्यातील सर्व सीमांवर खडा पहारा पोलिसांनी दिला. यात जिल्ह्यातील एकाही पोलिसांस कोरोनाची लागण झाली नाही. यापुढेही अशी सेवा बजावतील, असे सांगून सॅनिटायझर, संरक्षक सामग्रीचां पुरवठा जिल्ह्याला झाल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.
यावेळी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करणारे डॉक्टर्स तसेच कोविड काळात पोलीसांना मदत करणाऱ्या विशेष पोलीस अधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात शहीद जवान यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. आभार अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांनी मानले.

Src test

AC NEWS RADIO l बाहेर पडताना काळजी घ्या l मास्क लावूनच बाहेर पडा l गर्दीत जाण्याचे टाळा l सैनी टायझर नेहमी जवळ ठ...