Src test

AC NEWS RADIO l बाहेर पडताना काळजी घ्या l मास्क लावूनच बाहेर पडा l गर्दीत जाण्याचे टाळा l सैनी टायझर नेहमी जवळ ठेवा आणि वापर करा l बाहेरून आल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवा l सौजन्य : परीक्षेची सर्व पुस्तके आणि स्टडी मटेरियलसाठी एकमेव नाव : नोकरी संदर्भ द बुक गॅलरी, संपर्क - 0233-2324832 ||
radio

सोमवार दिनांक 04 एप्रिल 2022



18.6 कोटी रुपयांची देणगी

एक आध्यात्मिक गुरु आहेत. ज्यांनी अदानी, अंबानी आणि टाटा यांच्यापेक्षा जास्त दान मंदिरासाठी केले आहे. कथावाचक मोरारी बापू हे अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीत सर्वात मोठे देणगीदार म्हणून समोर आले आहेत. सहा दशकांहून अधिक काळ रामायणाचा प्रचार करणाऱ्या बापूंनी एकूण 18.6 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.

 

अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारी रोजी प्राण प्रतिष्ठा

अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारी रोजी प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 84 सेकंदात ही पूजा केली. यासोहळ्याची संपूर्ण जगात चर्चा आहे. राम मंदिर उभारण्यासाठी देशभरातूनमोठ्या प्रमाणात दान गोळा करण्यात आलं. आतापर्यंत मंदिरासाठी 5,500 कोटीपैसे दान स्वरुपात मिळाले आहे. महत्त्वाचं म्हणजे सर्वाधिक दान करणारीव्यक्ती कुणी दिग्गज उद्योगपती नसून एक आध्यात्मिक गुरु आहेत. ज्यांनी अदानी, अंबानी आणि टाटा यांच्यापेक्षा जास्त दान मंदिरासाठी केले आहे. कथावाचक मोरारी बापू हे अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीत सर्वात मोठेदेणगीदार म्हणून समोर आले आहेत. सहा दशकांहून अधिक काळ रामायणाचा प्रचार करणाऱ्या बापूंनी एकूण 18.6 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.

सीबीएसई संलग्न शाळांमध्ये आता भारतीय भाषांचा पर्याय


पुणे  : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात स्थानिक 
भाषांमधील शिक्षणावर भर देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. यानुसार सीबीएसई संलग्न शाळांमधील पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सध्या उपलब्ध असलेल्या पर्यायात भारतीय भाषेचा अधिकचा पर्याय देण्याची मुभा देण्यात आली आहे. उपलब्ध असणारे स्रोत, संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत, अन्य शाळांतील चांगल्या कार्यपद्धतींसाठी सहकार्य घेऊन बहुभाषिक शिक्षण प्रत्यक्षात आणण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.

शैक्षणिक धोरण 2020 मध्ये शिक्षणाच्या विविध स्तरांवर मातृभाषा, स्थानिक भाषा किंवा प्रादेशिक भाषांचा वापर शिक्षणाचे माध्यम म्हणून करण्याची शिफारस करण्यात आली आहे. आता या धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत बहुतांश सीबीएसई शाळांमध्ये इंग्रजी आणि हिंदी माध्यम वापरले जाते. या पार्श्वभूमीवर शिक्षणाचे माध्यम म्हणून स्थानिक भाषांचा वापर करण्याबाबतचे निर्देश सीबीएसईच्या शैक्षणिक विभागाचे संचालक डॉ. जोसेफ इमॅन्युएल यांनी परिपत्रकाद्वारे देशभरातील शाळांना दिले.

सीबीएसईने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेला (एनसीईआरटी) देशातील 22 भाषांमध्ये नवी पाठय़पुस्तके तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. एनसीईआरटीकडून पाठय़पुस्तके तयार करण्याचे काम सर्वोच्च प्राधान्याने करण्यात येत आहे. त्यामुळे ही नवी पुस्तके शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

विद्यार्थ्यांची सांस्कृतिक समज, भाषिक वैविध्य आणि शैक्षणिक कामगिरी उंचावण्यासाठी बहुभाषिक शिक्षण उपयुक्त ठरत असल्याचा स्वीकार सर्वत्र करण्यात आला आहे. त्यामुळे संलग्न शाळा भारतीय भाषांचा वापर शिक्षणाचे माध्यम म्हणून पूर्वप्राथमिक ते बारावी या स्तरावर करू शकतात. सध्या उपलब्ध असलेल्या पर्यायांमध्ये अधिकचे पर्याय म्हणून समाविष्ट करू शकतात. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातही इंग्रजी माध्यमासह भारतीय भाषांमध्ये अध्ययन अध्यापन, पाठय़पुस्तकांची निर्मिती सुरू करण्यात आली आहे, तसेच भारतीय भाषांमध्येच परीक्षाही घेतल्या जाणार आहेत. शालेय शिक्षणातील माध्यम उच्च शिक्षणात कायम राहत असल्याने शालेय शिक्षणात भारतीय भाषांचा समावेश करण्यात सीबीएसई संलग्न शाळांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

बहुभाषिक शिक्षण आणि शिक्षणाचे माध्यम म्हणून मातृभाषेचा समावेश करण्यात काही आव्हाने आहेत. बहुभाषिक पद्धतीने अध्यापन करू शकणारे कुशल शिक्षक, उच्च दर्जाच्या बहुभाषिक पाठय़पुस्तकांची निर्मिती, वेळेची मर्यादा, दोन सत्रांत चालणाऱ्या सरकारी शाळा, बहुभाषिक शिक्षणासाठी द्यावा लागणारा अधिकचा वेळ, ही आव्हाने असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

प.पू.स्वस्तिश्री भट्टारकचारूकीर्ति महास्वामीजी यांना विनयांजली

 

प.पू.स्वस्तिश्री भट्टारकचारूकीर्ति महास्वामीजी यांना विनयांजली

सांगली : श्रवणबेळगोळ येथील जगदुरु, कर्मयोगी प.पू.स्वस्तिश्री भट्टारकचारूकीर्ति महास्वामीजी यांचे दि. २३ मार्च रोजी पहाटे समाधी मरण झाले. दक्षिण भारत जैन सभेच्या सांगली येथील शेठ रा.ध.दावडा दिगंबर जैन बो्डिंगमध्ये विनयांजली सभा संपन्न झाली. सुरूवातीला पूज्य स्वस्तिश्री चारकीर्ति महास्वामीजींच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून णमोकार महामंत्राचे जाप्य

घालण्यात आले.

यावेळी बोलताना मुख्यमहामंत्री डॉ.अजित पाटील म्हणाले, प.पू. स्वस्तिश्री चारूकीर्ती भट्टारक महास्वामीजी आणि सांगलीचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांचा सन २००० चा चातुर्मास व २४

तीर्थंकर मूर्ती प्रतिष्ठाना नेमिनाथनगर सांगली येथे ऐतिहासिक स्वरूपात संपन्न झाला. यावेळी त्याचे सहा महिने वास्तव्य लाभले. याभागात विहार असताना ते . आवर्जून सांगलीला भेट देत असत.

चेअरमन रावसाहेब पाटील म्हणाले, अत्यंत विनम्र, संयमी व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून घेले. चामुंडरायानी भ. गोमटेश्वरांची मूर्ती स्थापून विश्वविख्यात केली असली तरी या मूर्तीची किर्ती जगभरात पसरविण्यात महास्वामीजींचा मोलावा वाटा होता. धार्मिक महोत्सवाबरोबरच त्यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्राचा एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला. डिसेंबर

२०१९ साली महास्वमाजींच्या ५० व्या भट्टाभिषेक सोहळ्यावेळी दक्षिण भारत जैन सभेच्यावतीने त्यांना चांदीचा कलश अर्पण करण्यात आला होता.  जैन बोर्डिंग चेअरमन प्रा.राहुल चौगुले म्हणाले, बोर्डिंगच्या विद्यार्थ्यानी श्रवणबेळगोळी येथे केलेल्या स्वच्छता मोहिमेचे खूप कौतुक महास्वामीजीनी केले होते. बो्डिंगच्या कार्याचे ते कौतुक करीत त्यांनी बो्डिंगच्या उपक्रमाना

सक्रिय सहकार्य केले आहेत. महापुराच्या काळात चातुमार्सातील बंधन असताना सुद्धा विहार करून संकटात असलेल्या लोकांना सर्वतोपरी मदत केली. मुख्यमंत्री सहाय्यता फंडासाठी त्यांनी १० लाखाची मदत दिली होती. डॉ. अशोक नाईक यांनीही बाहुबली विद्यापीठाच्याबतीने विनयांजली अर्पण केली.

यावेळी सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, डॉ. अजित पाटील, प्रगति आणि जिनविजयचे संपादक डॉ. महावीर अक्कोळे, माजी संपादक प्राचार्य थ्रीधर हेरवाडे, नीलम माणगावे, प्रा.डॉ. गोमटेश्वर पाटील, बा.भु.पाटील ग्रंथ प्रकाशनचे सेक्रेटरी एन.जे.पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.


भिडे गुरुजी यांच्या समवेत अनुभवलेल्या क्षणांचे शब्दचित्र लवकरच प्रकाशित

 

भिडे गुरुजी यांच्या समवेत अनुभवलेल्या क्षणांचे शब्दचित्र लवकरच प्रकाशित

सांगली : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या समवेत अनुभवलेल्या क्षणांचे शब्दचित्र असणार्‍या हदयस्थ समर्थ आणि जनात पूजीन श्रीरायगडा  अशा दोन पुस्तकांचे प्रकाशन श्रीरामनवमीच्या दिवशी म्हणजे ३० मार्च रोजी होणार आहे. येथील भावे नाट्य मंदिरात दुपारी ३.३० बा.हा पुस्तक प्रकाशन सोहळा होणार अशी माहिती या पुस्तकाचे लेखक मिलिंद तानवडे यांनी पत्रकार बैठकीत दिली. यावेळी नितीन काळे, राजेंद्र पुजारी,संतोष बापट,शितल नागे, अविनाश

सांळुखे आदी उपस्थित होते. या पुस्तकाचे प्रकाशन संभाजीराव भिडे गुरुजी, पांडुरंगराव बलकवडे, डॉ. मिलींद पराडकर, मोहनबुवा रामदासी, आप्पा परब आणि डॉ. अमर अडके आदी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. हृदयस्थ समर्थ' हा ग्रंथ थरीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या संदर्भातील अनुभवांवर आहे. या पुस्तकाचे लेखक धारकरी व विभाग प्रमुख

म्हणून श्री. भिडे गुरुजीं बरोबर संघटनेत कार्य करत आहेत. विविध प्रसंगात शी. भिडे गुरुजीं विषयी लेखकास आलेल्या वैयक्तिक अनुभवांचे लेख स्वरुपात असणारे चित्रण या ग्रंथात सादर केलेले आहे. श्री.भिडे गुरुजींवरील सचित्र असणारा हा पहिलाच ग्रंथ आहे. या ग्रंथास पांडुरंगराव बलकवडे याची प्रदिर्घ प्रस्तावना आणि गजाभाऊ महाजन गुरुजी आणि माधवराव गोगटे यांचे

अभिप्राय आहेत. लेखक मिलिंद तानवडे हे शरीरायगडपूजा व्रत, श्रीशिवप्रतिष्ठान गडकोट मोहीम तसेच वैयक्तिक भेट या स्वरुपात आतापर्यंत किमान साठ वेळा श्रीरायगड दर्शन केलेले आहे. या भेटीमधून लेखकास आलेल्या अनेक प्रकारच्या अनुभवांचे कथन मजनात पूजीन श्रीरायगड या सचित्र ग्रंथात केलेले आहे. सदर ग्रंथास श्री. भिडे गुरुजी यांची प्रदिर्घ प्रस्तावना आणि उष:ःप्रभा पागे व आप्पा परब यांचे अभिप्राय आहेत.


संजय घोडावत विद्यापीठाचा उपक्रम : आळते ग्रामस्थांना दिले अर्थकारणाचे धडे

 

संजय घोडावत विद्यापीठाचा उपक्रम : आळते ग्रामस्थांना दिले अर्थकारणाचे धडे  

जयसिंगपूर : संजय घोडावत विद्यापीठातील 'एम.बी.एद्वितीय वर्ष फायनान्सच्या विद्यार्थ्यांनी अर्थ प्रबोधन कार्यक्रमांतर्गत आळते येथील गावकऱ्यांना अर्थकारणाचे धडे दिले.यावेळी सरपंच अजिंक्‍य इंगवले,डॉ.रेबती देशपांडे उपस्थित होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांना आर्थिक नियोजन म्हणजे काय ? ते कसे करतात? का आणि कशासाठी करतात? त्याचे फायदे काय? या विषयाची माहिती दिली त्याचबरोबर लघु नाटिकेच्या सादरीकरणाद्वारे शासकीय योजनांची माहिती विद्यार्थ्यांनी उपस्थितांना दिली.यासाठी एक दिवस अगोदर विद्यार्थ्यांनी संवाद मोहीम राबवली. अशा प्रकारच्या आयोजनातून विद्यार्थ्यांना कार्यक्रम व्यवस्थापनाचे प्रशिक्षण मिळते. तसेच पुस्तकी ज्ञानाचे परिवर्तन प्रात्यक्षिक शिक्षणातून केल्यामुळे वास्तविक कार्पा रेट जगामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने कामगिरी करण्यास मदत होते. या कार्यक्रमाला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या उपक्रमासाठी विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ.अरुण पाटील, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेच्या अधिष्ठाता डॉ. योगेश्वरी गिरी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.


राष्ट्रवादी पुन्हा... वारे परिवर्तनाचे...जयंत पाटील यांचा झंझावाती दौरा सुरू

 

राष्ट्रवादी पुन्हा... वारे परिवर्तनाचे...जयंत पाटील यांचा झंझावाती दौरा सुरू 

नंदुरबार : विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शनिवारी संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणिमाजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी पुन्हा... वारे परिवर्तनाचे... ध्यास प्रगतीचा... या दौऱ्याला सुरुवात केली.

राज्यात परिवर्तनाच्या लढाईसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी उत्तर महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. चार दिवसाच्या या दौऱ्यात नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक या जिल्ह्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून स्थानिक पातळीवरील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्याचे ध्येय नजरेसमोर त्यांनी ठेवले आहे. स्थानिक पातळीवर प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षसंघटना वाढीवर आणि सभासद नोंदणीवर मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रीत करण्याचे आबाहन जयंतराव पाटील यांनी यावेळी केले. गाबागावात पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते निर्माण करण्याची

गरज आहे.पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सर्वांनी मिळून हातभार लावावा. एकसंघ राहून पक्षाचे काम केल्यास त्याचा उत्तम निकाल आपल्याला मिळेल असा दृढ विश्वासही जयंतराव पाटील यांनी

कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला.

सामान्य जनतेला आपल्या पक्षाकडून अनेक अपेक्षा आहेत. राज्याला प्रगतीच्या बाटेबर नेण्यासाठी या विश्वासाला पात्र ठरेल असे लोकोपयोगी काम करूया असे आवाहनही जयंतराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.

दौऱ्याची सुरुवात नंदुरबार जिल्हयातील शहादा विधानसभा मतदारसंघातून झाली. शहादा येथे

घेतलेल्या या आढावा बैठकीला ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे, माजी मंत्री हेमंत देशमुख, नंदुरबार जिल्हा निरीक्षक नानासाहेब महाले, नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे, धुळे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनावणे, माजी आमदार उदयसिंग पाडवी, जिल्हा उपाध्यक्ष मोहन शेवाळे,

युवक जिल्हाध्यक्ष मनोज महाजन, तळोदा शहराध्यक्ष योगेश मराठे, शहादा-तळोदा विद्यार्थी अध्यक्ष कुणाल पाडवी, तळोदा तालुकाध्यक्ष पुंडलिक राजपूत, शहादा तालुकाध्यक्ष माधव पाटील, शहादा

शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Src test

AC NEWS RADIO l बाहेर पडताना काळजी घ्या l मास्क लावूनच बाहेर पडा l गर्दीत जाण्याचे टाळा l सैनी टायझर नेहमी जवळ ठ...