आदिवासी आशा वर्कर फोब्र्सच्या यादीत

 


प्रभावशाली महिला : अंधश्रद्धेचे समूळ उच्चाटन केल्याबद्दल गौरव

भुवनेश्वर : ओडिशातील आदिवासी आशा स्वयंसेविका मतिल्दा कुल्लू (वय ४५) यांचा जगप्रसिद्ध फोब्र्स या नियतकालिकाने जगातील सर्वाधिक प्रभावशाली महिलांच्या यादीत समावेश केला आहे.
सुंदरगड जिल्हातील बडागाव तालुक्यातील गर्गडबहल गावच्या रहिवासी असणाèया कुल्लू गेल्या १५ वर्षांपासून आशा स्वयंसेविका म्हणून कार्यरत आहेत. कुल्लू यांनी जनजागृती करून या भागातील काळ्या जादुसारख्या सामाजिक समस्येचे समूळ उच्चाटन केले आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव करत फोब्र्सने प्रसिद्ध बँकर अरुंधती भट्टाचार्य आणि अभिनेत्री रसिका दुग्गल यांसारख्या प्रतिभावान महिलांच्या बरोबरीने २०२१ च्या यादीत कुल्लू यांचा समावेश केला आहे.
 कुल्लू यांच्या दैनंदिन कामाची सुरुवात पहाटेपाच वाजल्यापासून होते. कुटुंबातील चार लोकांची जबाबदारी सांभाळणाèया कुल्लू  घरकाम आवरून सायकलवरून आशा स्वयंसेविकेच्या कार्यासाठी घराबाहेर पडतात. गावातील प्रत्येक घरात जाऊन कोरोना लसीकरण, प्रसूतीपूर्व तपासणी, प्रसूतीनंतरची तपासणी , स्तनपान, महिलांच्या विविध समस्या आणि कोरोना
संसर्गाबाबत जनजागृतीचे काम त्या करतात. मतिल्दा म्हणाल्या की, कोरोना महारोगराईनंतर माझी जबाबदारी आणखीनच बाढली. कोरोनाची लक्षणे असणाèया लोकांच्या तपासणीसाठी रोज गावातील ५० ते ६० घरांत जावे लागत असे.कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर आणि कोरोना लसीकरण करण्यासाठी लोकांना मला खूप समजावून सांगावे लागले. सध्या दरमहा ४ हजार ५०० रुपये पगार मिळतो. मी माझ्या कामात आनंदी आहे.


अनुरूप, सुशिक्षित जोडीदार हवा : मराठा वधू-वर मेळाव्यात तरुणींच्या अपेक्षा


सांगली : निव्यर्सनी, सुशिक्षित, उत्तम नोकरी, थोडी शेती व व्यवसाय करणारा अनुरूप जोडीदार हवा, अशी अपेक्षा मराठा समाजच्यावतीने आयोजित वधू - वर मेळाव्यात सहभागी युवतींनी व्यक्त केल्या. तर लग्न करताना जोडीदाराची पत्रिका बघणार नाही, असेही मत बहुसंख्य वधू-वरांनी यावेळी व्यक्त केले.

मराठा समाज सांगली यांच्यावतीने २३५ वा मराठा समाज वधू -वर व पालक परिचय मेळावा झाला. कोरोनामुळे दीड वर्षानंतर प्रथमच आज हा मेळावा झाला. वधू-वरांसह पालक उत्स्फूर्त सहभागी झाले होते.

संस्थेचे माजी अध्यक्ष रघुनाथ पाटील यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दरम्यान, मनमिळावू, पदवीधर, कुटुंबाला सांभाळणारी मुलगी असावी, अशा अपेक्षा मुलांनी व्यक्त केल्या. मराठा समाजचे अध्यक्ष अभिजित पाटील, उपाध्यक्ष ए. डी. पाटील, सरचिटणीस प्रमोद शिंदे, विकास मोहिते, अँड. विलासराव हिरुगडे, शशिकांत जाधव, दत्तात्रय सावंत, संभाजीराव पाटील - सावर्डेकर, बाबासाहेब भोसले, डॉ. मोहन पाटील उपस्थित होते.


आटपाडीमध्ये सिद्धनाथ तैलचित्राचे अनावरण

 

नवोदित चित्रकार प्रतीक अभंगराव यांच्या कलेचे कौतुक

आटपाडी : खरसुंडी (ता. आटपाडी) येथील सिद्धनाथांच्या तैलचित्राचे अनावरण जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांच्याहस्ते करण्यात. आले. खरसुंडी येथील नवोदित चित्रकार प्रतीक अभंगराव यांनी हे चित्र रेखाटले आहे.

यावेळी दिघंचीचे सरपंच अमोल मोरे, सदस्य बाळासाहेब होनराव, युवा सेना अध्यक्ष संतोष पुजारी, राजेश नांगरे, देवस्थान टस्टचे अध्यक्ष चंद्रकांत पुजारी, विश्वस्त विजयकुमार भांगे, माजी सरपंच अर्जुन सावकार, मोहन शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी तानाजी पाटील यांनी चित्रकार अभंगराव यांच्या कलेचे कौतुक करून भविष्यात मदत करण्याची ग्वाही दिली. सूत्रसंचालन विनोद पुजारी यांनी केले.


पलूसमध्ये विदेशी पक्ष्यांचे आगमन : पक्षी प्रेमींना सुवर्णसंधी

 

पलूस : नोव्हेंबर महिना हा पक्षीप्रेमींना पक्षी निरिक्षणाची मोठी संधी घेऊन येत असतो. या काळात पाणथळीच्या ठिकाणी देश-विदेशातून पक्षी यर्जीं असतात. पलूस येथील इंगळे पाझर तलावपक्षी निरिक्षणासाठी उत्तम पर्वणी ठरणार आहे. या तलाव परिसरात पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने पाहणी केली असता तब्बल ५० पेक्षा अधिक पक्षी पहायला मिळाल्याची माहिती पक्षीप्रेमी संदीप नाझरे यांनी दिली आहे.

यावेळी धान तीरचिमणी, तांबूस शेपटीचा चंडोल, सामान्य तुतारी, पांढरा, पिवळा, करडा धोबी, कंठेरी चिखल्या,  ठपकेदार तुतवार, मलबारी मैना या सर्व पाहुण्या पक्षांनी तळ ठोकला असल्याचे दिसले. तर पानकावळा, पांर्ढया छातीचा धीवर, काळा शराटी, रॉबिन, गोरली, मोठा बगळा, पांढया मानेचा करकोचा, चमचे, रंगीत करकोचा, मोहोळघार, बटबट्या, तांम्रमुखी टिटवी, शेकाट्या, मध्यम बगळा, रिव्हर टर्न, बामन मैना, हुदहुद, लाजरी पाणकोंबडी, कोतवाल, लालबुडी बुलबुल, भिंगरी, पारवा, खाटीक, कोकिळा, सुगरण, हळदीकुंकू बदक, लांब शेपटीचा सातभाई या स्थानिक तसेच स्थानिक स्थलांतरित पक्षीही मोठ्या संख्येने पहायला मिळत आहेत. तर नाम्या वारकरी, माळ टिटवी या पक्षांचे तालुक्यात पहिल्यांदाच दर्शन झाले आहे. तसेच रंगीत करकोचा आणि युरेशियन चमचा या पक्षांची संख्या लक्षणीय आहे. या पाझर तलावाची स्वच्छता राखल्यास व वेळोवेळी पाणी सोडल्यास हा परिसर पक्षांचे माहेरघर ठरणार असल्याची अपेक्षा संदीप नाझरे यांनी व्यक्त केली.


Radio News

radio

शुक्रवार दि. 26 नोव्हेंबर 2021



राष्ट्रीय महामार्गवर इस्लामपूर जवळ 11 लाखाचा कोकेन सदृश्य अंमली पदार्थ जप्त

1 डिसेंबर पासून ग्रामीण व शहरी भागातील शाळा सुरू होणार

संविधान दिनानिमित्त माहिती. व जन संपर्क महा संचालनालय मुंबई तर्फे माहिती पटाचे प्रसारण

मिरजेतील रेल्वे स्थानकाजवळील वस्ती व अतिक्रमणे हटविली

महापालिका क्षेत्रातील सर्व वृक्षांची गणना होणार

भाजपा ओबीसी मोर्चाचा प्रचार रथ सांगलीत दाखल

सांगली जिल्ह्यात 9 डिसेंबर अखेर मनाई आदेश

राष्ट्रवादीच्या भव्य किल्ला स्पर्धेत मिरजेच्या रौद्र शंभू युवा मंच प्रथम

गुंठेवारी नियमितीकरण शिबिरात 985 प्रस्ताव दाखल

मार्च 2022 पर्यंत मिळणार गरिबांना मोफत धान्य

आर्यन हार्ट क्लिनिकला 6 वर्षे पूर्ण : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हाच्या वतीने शुभेच्छा



 मा.ना.जंयतरावजी पाटील साहेब (जलसंपदामंत्री महाराष्ट्र राज्या तथा पालकमंत्री सांगली जिल्हा ) यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हा अध्यक्ष मा.संजयजी बजाज साहेब यांच्या नेत्तुत्वाखाली  अविरतपणे सुरु असलेल्या महाआरोग्य शिबीराठी आम्हाला रात्र दिवस हर्ट च्या आँपरेशन साठी आम्हाला मदत करणारे  डाँ रियाज मुजावर सर यांच्या आर्यन हार्ट क्लिनिक च्या 6 वर्षे पुर्ण झाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हाच्या वतिने पुष्पगुच्छ देउन शुभेच्छा देण्यात आल्या

यावेळी उपस्थित  मा.नगरसेवक अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष मा.आयुब भैय्य बारगिर( मिरज शहर अध्यक्ष) मा. अभिजित  हारगे (युवक उपाध्यक्ष)मा. संदिप व्हनमाने  (शहर जिल्हा उपाध्यक्ष)  विजय माळी (अल्पसंख्याक कार्याध्यक्ष) मा.अशरफ शेख

RADIO NEWS

radio

मंगळवार दि. 23 नोव्हेंबर 2021



राष्ट्रवादीच्या शिबिराचा अनेकांना लाभ

राष्ट्रवादीच्या शिबिराचा अनेकांना लाभ

राष्ट्रवादीच्या शिबिराचा अनेकांना लाभ

राष्ट्रवादीच्या शिबिराचा अनेकांना लाभ

राष्ट्रवादीच्या शिबिराचा अनेकांना लाभ

राष्ट्रवादीच्या शिबिराचा अनेकांना लाभ

राष्ट्रवादीच्या शिबिराचा अनेकांना लाभ

राष्ट्रवादीच्या शिबिराचा अनेकांना लाभ

राष्ट्रवादीच्या शिबिराचा अनेकांना लाभ

राष्ट्रवादीच्या शिबिराचा अनेकांना लाभ

खंडणी बहाद्दर रतन कांबळे पोलिसांच्या ताब्यात : गुन्हा मागे घेण्यासाठी जीवे मारण्याची धमकी

 

सांगली : पाच हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या रतन रमेश कांबळे (वय ३६,रा. नविन वसाहत, टिंबर एरिया) या संशयितास अटक केली. विश्रामबाग पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.

दरम्यान, खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हा मागे घेण्यासाठी कांबळे हा फिर्यादी अंकुश विजय पाटील याला जीवे मारण्याची धमकी देत होता.

पोलिसांनी सांगितले, अंकुश पाटील याच्या येथील कॉलेज कॉर्नरवरील एका पान शॉप येथे

महिनाभरापूर्वी रतन कांबळे आणि त्याचा मित्र पवन बुचडे गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी पाच हजार रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास मारण्याची धमकी दिली. त्यानंतर याबाबत अंकुशने विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली. कांबळे विरोधात गुन्हा दाखल झाला. त्याच्या विरोधात मारामारी, धमकावणे आदी प्रकारचे आठ गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी पोलिस त्याचा शोध घेत होते. मात्र, तो सापडत नव्हता. तो फिर्यादी अंकुश पाटील याच्याकडे गुन्हा मागे

घेण्यासाठी दबाब टाकत होता. माझ्या बाजूने न्यायालयात म्हणणे सादर केले नाही तर तुला ठार मारेन, अशी धमकी त्याने दिली होती. रतन हा पत्नीला भेटण्यासाठी येणार आहे, अशी माहिती

पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी त्याला पकडले. विश्रामबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक कल्लाप्पा पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अमित पाटील, अनिल ऐनापुरे, आदिनाथ माने, स्वप्निल कोळी, सर्जेराव पवार, दरिबा बंडगर आदींच्या पथकाने ही कारवाई केली. सहायक पोलिस निरीक्षक अनिल ऐनापुरे तपास करीत आहेत.


Radio News

मंगळवार दि. 23 नोव्हेंबर 2021radio

बातमी ऐकण्यासाठी प्ले बटणवर क्लिक करा


राष्ट्रवादीच्या शिबिराचा अनेकांना लाभ

राष्ट्रवादीच्या शिबिराचा अनेकांना लाभ

राष्ट्रवादीच्या शिबिराचा अनेकांना लाभ

राष्ट्रवादीच्या शिबिराचा अनेकांना लाभ

राष्ट्रवादीच्या शिबिराचा अनेकांना लाभ

राष्ट्रवादीच्या शिबिराचा अनेकांना लाभ

राष्ट्रवादीच्या शिबिराचा अनेकांना लाभ

राष्ट्रवादीच्या शिबिराचा अनेकांना लाभ

राष्ट्रवादीच्या शिबिराचा अनेकांना लाभ

राष्ट्रवादीच्या शिबिराचा अनेकांना लाभ

 रक्षणाची गरज असलेल्या बालकांकडे विशेष लक्ष द्या : न्या. विश्वास माने


सांगली: समाजातील सर्व घटकांनी काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांकडे विशेष लक्ष देवून त्यांना योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे, असे मत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव न्या. विश्वास माने यांनी व्यक्त केले.

बालदिनाच्या निमित्ताने जिल्हा महिला व बाल विकास विभागामार्फत वेलणकर बालकाश्रम सांगली येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार, बाल कल्याण समिती अध्यक्षा अ‍ॅड. सुचेता मलवाडे, अ‍ॅड. शोभा पाटील, शिवकुमारी ढवळे, अ‍ॅड. एम.एस. पखाली, सदस्य बाल न्याय मंडळ व  अधिक्षीका अनुराधा डुबल आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार यांनी दि. २० नोव्हेंबर पर्यंत बालकांचे अधिकार संबंधित जिल्हा स्तरावर  वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच न्या. नंदा घाटगे, बाल न्याय मंडळ व डॉ. जयश्री पाटील यांनी बाल दिनाचे औचित्य साधून बालकांना मार्गदर्शन केले व बालकांबाबत समाजाने जागृत असणे महत्वाचे असल्याचे सांगून बालकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मोहन सुर्यवंशी व सुषमा सुर्यवंशी यांनी बालगृहास संगणक संच भेट दिला.


Src test

AC NEWS RADIO l बाहेर पडताना काळजी घ्या l मास्क लावूनच बाहेर पडा l गर्दीत जाण्याचे टाळा l सैनी टायझर नेहमी जवळ ठ...