वादग्रस्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची निविदा रद्द करा : अखेर भाजपने केली मागणी

वादग्रस्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची निविदा रद्द करा : अखेर भाजपने केली मागणी



सांगली : महापालिका क्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये अनेक त्रुटी निदर्शनास येत आहेत. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया रद्द करून निविदामधील त्रुटी दूर कराव्यात व फेरनिविदा प्रक्रिया राबवावी, अशी मागणी भाजपचे नेत्यांनी आयुक्तांनाकडे केली आहे. अखेर सत्ताधारी भाजपने ही निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी तब्बल ४० दिवसांनी केल्याने आयुक्त यावर काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
घनकचरा प्रकल्पाची निविदा प्रसिध्द करण्यात आली आहे. सोमवार दि. १३ रोजी निविदा प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. मात्र या निविदेवर सत्ताधारी भाजपमध्ये दोन गट पडले होते. त्यामुळे भाजपच्या भूमीकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर भाजपने ही निविदा प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी केली आहे. भाजपचे खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीरदादा गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, शहर जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे, शेखर इनामदार, मकरंद देशपांडे दिनकर पाटील, सुरेश आवटी, महापौर गीता सुतार, उपमहापौर आनंदा देवमाने, गटनेते युवराज बावडेकर यांनी संयुक्तरिता आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीत निविदा प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी केली असल्याचे सांगितले.

Src test

AC NEWS RADIO l बाहेर पडताना काळजी घ्या l मास्क लावूनच बाहेर पडा l गर्दीत जाण्याचे टाळा l सैनी टायझर नेहमी जवळ ठ...