मा.ना.जंयतरावजी पाटील साहेब (जलसंपदामंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सांगली जिल्हा ) यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हा अध्यक्ष मा.संजयजी बजाज साहेब यांच्या नेत्तुत्वाखाली अविरतपणे सुरु असलेल्या महाआरोग्य शिबीर अतर्गत सांगलीतील एका रूग्णाचे एका मोठ्या हाॅस्पीटल मध्ये ऑन्जियोग्राफी करण्यात आली त्यासाठी त्या रूग्णाला तिन दिवस अॅडमिट करूण सुमारे 25 ते 30 हजार रूपये बिल आकारण्यात आले तसेच त्या रूग्णाची ऑन्जियोप्लास्टी करण्यासाठी सुमारे दिड लाख रूपये खर्च सांगण्यात आले होते.
सदर रूग्णाचे नातेवाईक आमच्या संपर्कात आल्यानंतर रूग्णाची ऑन्जियोप्लास्टी डाॅ. रियाज मुजावर (काॅर्डियालाॅजिस्ट) यांनी सांगलीतील भारती हॉस्पिटलमध्ये महात्मा जोतीबा फुले योजने अंतर्गत पुर्णपणे मोफत करण्यात आले.
रूग्णाला भेट प्रसंगी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शहर जिल्हा व अल्पसंख्यांक सेल सांगली शहर जिल्ह्या चे पदाधिकारी उपस्थित होते.
या कामाचा पाठपुरवठा मा.नगरसेवक अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मा.आयुब भैय्या बारगिर व आरिफ गडकरी यांनी केला.