चला करू निर्धार एड्सला करू हद्दपार विषमता संपवा, एड्स संपवा, महामारी संपवा

आज सारे जग कोरोनाच्या विषाणूमुळे धास्तावलेले आहे. अशाच पध्दतीचा एक मानवी जीवनाला धक्का देणारा एचआयव्ही (एड्स) विषाणूचा १९८३ साली जगात तर १९८६ साली भारतात पहिला रूग्ण सापडला. गेली ३५ वर्षे या विषाणूशी सारे जग आणि आपला भारत देश लढत आहे. या रोगाने लाखोंचे बळी घेतलेले आहेत. सद्यस्थितीत या रोगाचे रूग्ण जरी कमी झाले असले तरी हा रोग समूळ नष्ट झालेला नाही. आजही एचआयव्ही पॉझिटीव्ह रूग्ण सापडत आहेत. या रोगाची दाहकता पाहूनच जनजागृतीसाठी जगात १ डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षीचे घोषवाक्य ङ्कएपव ळपशर्qीरश्रळींळशी एपव अखऊड. एपव रिपवशाळलीङ्क (विषमता संपवा एड्स संपवा. महामारी संपवा) हे आहे. एचआयव्ही हा रोग घातक जरी असला तरी त्याच्यावर मात करण्यासाठी मानवाने जागरूकपणे आणि संयमाचे जीवन जगले पाहिजे. एचआयव्ही होवू नये यासाठी विशेषत: तरूण पिढीने काळजी घेणे ही काळाची गरज आहे. एड्स दिनानिमित्त चला करू निर्धार एड्सला करू हद्दपार. एड्स रोगासंदर्भात माहिती व्हावी, गैरसमज दूर व्हावेत यासाठी या लेखाच्या माध्यमातून माहिती देण्याचा हा प्रयत्न.

एचआयव्ही म्हणजे रोगप्रतिकार शक्तीचा नाश करणारा विषाणू आहे. आणि एडस् म्हणजे मानवी रोगप्रतिकार शक्तीचा नाश झाल्यामुळे होणारा रोग लक्षणांचा समुह आहे. शंका असल्यास प्रत्येकाने व एचआयव्ही संसर्गित आई वडीलांनी त्यांच्या मुलांची एचआयव्ही रक्त तपासणी करणे खुप गरजेचे आहे. तसेच लग्नापूर्वी आपली व आपल्या जोडीदाराची एचआयव्ही तपासणी करून घेणे काळाची गरज आहे. एचआयव्ही तपासणी ही सर्व सरकारी दवाखान्या मध्ये मोफत केली जाते. एचआयव्ही विषाणू मानवी शरीरामध्ये विर्य, योनीस्त्राव, मानवी रक्त व आईच्या दुधात आढळतो. तसेच एचआयव्ही संसर्ग फक्त असुरक्षीत लैंगीक संबंध, दुषीत रक्त व रक्त घटक वापरल्याने, दुषीत सुई सिंरीजचा वापर केल्याने आणि एचआयव्ही संसर्गित गर्भवती मातेकडून तिच्या होणाèया बाळाला होऊ शकतो. इतर कोणत्याही कारणाने एचआयव्हीची लागण होत नाही.

निरोध हा जसा कुटूंबनियोजन किंवा नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी याचा उपयोग होतो, तसाच एचआयव्ही आणि गुप्तरोग होवू नये म्हणुन सुध्दा होतो. नवरा बायको दोघेही एचआयव्ही संसर्गित असतील तरीही निरोधचा वापर करणे गरजेचे आहे. कारण यामुळे औषधोपचारास प्रतिकारशक्ती निर्माण झालेला विषाणू एका व्यक्तीच्या शरीरातुन दुसèया व्यक्तीच्या शरीरात जात नाही त्यामुळे कखत संसर्गित व्यक्तीस सुरू केलेली अठढ औपचोपचार पध्दती यशस्वीपणे लागु पडते व या विषाणूस आपण नियंत्रणात ठेवू शकतो.

सद्यस्थीतीला टिड्ढट ऑल पॉलीसी अतंर्गत सर्व संसर्गित रूग्णांना एआरटी उपचार मोफत सुरू केले जातात व सर्व रुग्णांची उऊ४ तपासणी तळीरश्र ङेरव तपासणी मोफत करून योग्य तो उपचार दिला जातो. एचआयव्ही संसर्गित रुग्णांना एआरटी औषधोपचारामध्ये सातत्य टिकवणे गरजेचे असते त्याव्दारे एचआयव्ही या विषाणू वर नियंत्रण ठेवता येते. सद्या एचआयव्ही पुर्ण बरा होण्यासाठी कोणतेही औषध नाही. मात्र नियमीत एआरटी औषधोपचारामुळे रुग्णाची रोगप्रतिकारशक्ती वाढवुन विषाणू वाढीवर नियंत्रण ठेवता येते. परंतु औषधे बंद केली तर हा विषाणू औषधांना दाद देत नाही व रुग्णाला त्रास सहन करावा लागतो.

एचआयव्ही एड्स बाबत वैयक्तीक व गोपणीयपणे माहीती मिळावी म्हणुन १०९७ ही हेल्प लाइन फोन नंबरची सेवा एचआयव्ही/एड्स, गुप्तरोग आजाराबद्दल २४ तास उपलब्ध आहे. सदर सेवा सर्व भाषा मध्ये पुरवली जाते.

एच. आय. व्ही. संसर्गित पालकांच्याकडून बाळाला होणारा कखत संसर्ग

एच आय व्ही संसर्गाची प्रमुख चार कारणे आहेत.  त्यापैकी एच. आय. व्ही. संसर्गित मातेपासून बाळाला होणारा संसर्ग हा खूप नाजूक व संवेदनशील विषय आहे.  गरोदर मातेकडुन बाळाला होणारा संसर्ग टाळण्यासाठी आपण सर्व गरोदर स्त्रीयांची कखत ची तपासणी करतो. ही तपासणी शक्य तेवढ्या लवकर करून घेणे गरजेचे असते. कारण तपासणीनंतर हा  रिपोर्ट पॉझीटिव्ह आला तर तीची कखत व्हायरल लोड, उऊ४ तपासणी व इतर तपासण्या करून ए आर टी औषधोपचारावर घेतले जाते. त्याचबरोवर तीची प्रसूती सर्व वैद्यकीय काळजी घेऊन रुग्णालयात केली जाते. या सर्व प्रक्रीयेमुळे बाळाला गर्भाशयात किंवा प्रसुतीदरम्यान कखत संसर्ग होऊ नये याची काळजी घेतली जाते. त्याचबरोबर एच. आय. व्ही. संसर्गित मातेपासून जन्मलेल्या बाळाला एच. आय. व्ही. संसर्ग होऊ नये म्हणुन औषधोपचार केला जातो. तसेच अशा बाळांची ६ वा आठवडा, ६ महीने, १२ महीने या वयोगटात ऊछअ-झउठ द्वारे तपासणी केली जाते व १८ महिन्यानंतर रपींळलेवू तपासणी करून हे बाळ एचआयव्ही संसर्गित आहे किंवा नाही याची खात्री केली जाते. महत्वाचे म्हणजे या सर्व सेवा शासनामार्फत मोफत पुरविल्या जातात. डॉक्टर व समुपदेशक यांनी केलेल्या मार्गदर्शनाचे पालकांकडून योग्य पालन झाल्यास मातेपासून बाळाला होणारा संसर्ग आपण पुर्णपणे रोखू शकतो. परंतु यामध्ये दुर्देवाने बाळ एच आय व्ही संसर्गित सापडलेच तर त्यालाही ए आर टी औषधोपचारावर घेतले जाते. त्याचबरोबर एच. आय. व्ही. चे लवकर निदान झाल्याने गर्भवतीच्या पतीची व इतर अपत्ये असल्यास त्याची वेळेत तपासणी होऊ शकते.

गर्भवती मातांची एच.आय.व्ही. तपासणी ही प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामिण रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयात मोफत केली जाते. त्याचबरोबर एच. आय. व्ही. संसर्गित मातेपासून जन्मलेल्या लहान मुलांची ऊछअ-झउठ व १८ महीन्यानंतर रपींळलेवू तपासणी ही आय सी टी सी, ग्रामिण रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रूग्णालयात केली जाते.

सांगली जिल्ह्यात सन २०२१ मध्ये ५४ हजार ३३९ गर्भवती मातांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये २६ माता संसर्गित सापडल्या व ५१ बालके तपासण्यात आली त्यापैकी ५० बालके एचआयव्ही संसर्गापासून मुक्त निदर्शनास आली आणि उरलेले एक बालक पुढील औषधोपचारासाठी एआरटी विभागाशी संलग्नीत करण्यात आले. तरीही नागरिकांनी गुप्तरोग व काही लक्षणे आढळल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात, उप जिल्हा रूग्णालय, जिल्हा रूग्णालयाशी संपर्क साधून संपूर्ण  माहिती देणेही तितकेच आवश्यक आहे. औषधोपचारासाठी शासन आपल्या पाठीशी असून या रोगासंदर्भात सर्व उपचार मोफत केले जातात.

श्री. रणजित पवार

माहिती सहायक

जिल्हा माहिती कार्यालय, सांगली


Src test

AC NEWS RADIO l बाहेर पडताना काळजी घ्या l मास्क लावूनच बाहेर पडा l गर्दीत जाण्याचे टाळा l सैनी टायझर नेहमी जवळ ठ...