भिडे गुरुजी यांच्या समवेत अनुभवलेल्या क्षणांचे शब्दचित्र लवकरच प्रकाशित
सांगली : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी
यांच्या समवेत अनुभवलेल्या क्षणांचे शब्दचित्र असणार्या हदयस्थ समर्थ आणि जनात पूजीन श्रीरायगडा
अशा दोन पुस्तकांचे प्रकाशन
श्रीरामनवमीच्या दिवशी म्हणजे ३० मार्च रोजी होणार आहे. येथील भावे नाट्य मंदिरात
दुपारी ३.३० बा.हा पुस्तक प्रकाशन सोहळा होणार अशी माहिती या पुस्तकाचे लेखक
मिलिंद तानवडे यांनी पत्रकार बैठकीत दिली. यावेळी नितीन काळे, राजेंद्र पुजारी,संतोष बापट,शितल नागे, अविनाश
सांळुखे आदी उपस्थित होते. या पुस्तकाचे
प्रकाशन संभाजीराव भिडे गुरुजी, पांडुरंगराव
बलकवडे, डॉ. मिलींद पराडकर,
मोहनबुवा रामदासी, आप्पा परब आणि डॉ. अमर अडके आदी
मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. हृदयस्थ समर्थ' हा ग्रंथ थरीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे
संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या संदर्भातील अनुभवांवर आहे. या पुस्तकाचे
लेखक धारकरी व विभाग प्रमुख
म्हणून श्री. भिडे गुरुजीं बरोबर
संघटनेत कार्य करत आहेत. विविध प्रसंगात शी. भिडे गुरुजीं
विषयी लेखकास आलेल्या वैयक्तिक अनुभवांचे लेख स्वरुपात असणारे चित्रण या ग्रंथात
सादर केलेले आहे. श्री.भिडे गुरुजींवरील सचित्र असणारा हा पहिलाच ग्रंथ आहे. या
ग्रंथास पांडुरंगराव बलकवडे याची प्रदिर्घ प्रस्तावना आणि गजाभाऊ महाजन गुरुजी आणि
माधवराव गोगटे यांचे
अभिप्राय आहेत. लेखक मिलिंद तानवडे हे शरीरायगडपूजा
व्रत, श्रीशिवप्रतिष्ठान
गडकोट मोहीम तसेच वैयक्तिक भेट या स्वरुपात आतापर्यंत किमान साठ वेळा श्रीरायगड दर्शन
केलेले आहे. या भेटीमधून लेखकास आलेल्या अनेक प्रकारच्या अनुभवांचे कथन मजनात
पूजीन श्रीरायगड या सचित्र ग्रंथात केलेले आहे. सदर ग्रंथास श्री. भिडे गुरुजी यांची
प्रदिर्घ प्रस्तावना आणि उष:ःप्रभा पागे व आप्पा
परब यांचे अभिप्राय आहेत.