अंकलखोप येथे पकडली 4 फुटी मगर

अंकलखोप येथे पकडली 4 फुटी मगर

अंकलखोप ( ता. पलुस ) येथील वैभव नगर रोड लगत असलेल्या राजेंद्र यादव यांच्या शेतातील घराजवळील विहिरीतून साधारण ४ फुट लांबीची मगर पकडून वन विभागाच्या ताब्यात देण्यात आली. वन विभागाकडून सदर मगरीला निसर्ग अधिवासात सोडण्यात आले.
ऑगस्ट२०१९ च्या महापुराच्या पाण्यातुन आलेलं १ फुट लांबीचे मगरीचे पिल्लू अंकलखोप येथील राजेंद्र यादव यांच्या शेतातील घराजवळील विहिरीत विसावले होते. या मगरीच्या पिलाची शारीरिक वाढ झाली असून, सध्या या मगरीची लांबी सुमारे चार फुट झाली आहे. ही मगर वारंवार विहिरीतून बाहेर येऊन पुन्हा पाण्यात जात होती.परंतू या मगरीला पकडता येत नव्हते. त्यामुळे यादव कुटूंबाला काळजी लागली होती. सध्या यादव यांच्या विहीरीचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाच्या भिंतीच्या मध्ये हि मगर अडकून राहिली असल्याचे यादव यांना दिसून आले. त्यातुन बाहेर पडण्यासाठी ही मगर धडपडत होती. मात्र सुटका होत नव्हती. तेंव्हा राजेंद्र यादव, त्यांचा मुलगा संदीप यादव, पुतण्या राहूल व संतोष यांनी प्रयत्न करून तिला विहिरीतून बाहेर काढले. त्यानंतर वन विभागाला सदर घटनेची कल्पना देऊन, सदर मगर वनविभागाच्या ताब्यात देण्यात आली. पलूसचे परिमंडल वनअधिकारी मारुती ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे नियतक्षेत्र अधिकारी शहाजी ठवरे, वन सहाय्यक सागर गोयकर, प्राणीमित्र विवेक सुतार, मोहसीन सुतार यांनी सदर मगरीला ताब्यात घेऊन, सुरक्षितपणे निसर्ग अधिवासात सोडले‌.

Src test

AC NEWS RADIO l बाहेर पडताना काळजी घ्या l मास्क लावूनच बाहेर पडा l गर्दीत जाण्याचे टाळा l सैनी टायझर नेहमी जवळ ठ...