सांगलीच्या सिव्हील हॉस्पिटलमधील ब्रदरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह : स्टाफ सह १०९ जणांना केले क्वारंटाइन 
सांगलीच्या सिव्हील हॉस्पिटलमधील ब्रदरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह  आल्यानंतर त्या ब्रदरच्या सपं र्कात
असणारे ब्रदरसह पाचजणांना आयसोलेशन कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहे.  यामध्ये सिव्हील हॉस्पिटल मधील स्टाफ सह १०९ जणाना क्वारंटाइन करण्यात आले आहे. संबधित ब्रदर राहात असणाऱ्या शिकलगार गल्लीमध्ये महापालिकेकडून औषध फवारणी करण्यात आली असून आयुक्त नितीन कापडणीस यांनी भेट देऊन त्या कंटेन्मेंट झोनची पाहणी करीत खबरदारीच्या सूचना केल्या. सिव्हील मधील ब्रदर हा
मूळचा मलकापूरचा असून तो सांगली सिव्हील मधील अस्थिव्यंग विभागात कामास आहे.
बुधवारी त्या ब्रदरच्या घशात त्रास होऊ लागल्याने त्याची तपासणी केल्यानंतर शुक्रवारी त्याचा अहवाल
पॉझिटिव्ह आला . हा रिपोर्ट येताच महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने उपायुक्त स्मृती पाटील , आरोग्यधिकारी डॉ रवींद्र ताटे यांच्यासह वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक तो ब्रदर राहात असणाऱ्या खणभाग गोसावी गल्ली नजीकच्या शिकलगार गल्लीत दाखल झाले.
यावेळी तो बद्र र राहात असणाऱ्या  घराचे घरमालक आणि त्याचे रूम पार्टनर अशा पाच जणांना तातडीने ताब्यात घेऊन आयसोलेशन विभागात पाठवले आहे. याचबरोबर सिव्हील हॉस्पिटलमधील अस्थीव्यंग
विभाग सुद्धा मनपाने सील करून तो परिसर निर्जंतुक केला आहे.
याचबरोबर शिकलगार गल्लीतही औषध फवारणी करून परिसरातील नागरिकांना खबरदारीच्या सूचना केल्या आहेत. सायंकाळी मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी शिकलगार गल्लीला भेट देत खबरदारीच्या उपाययोजनेबाबत प्रशासनाला आवश्यक सूचना केल्या.
यावेळी पोलीस निरीक्षक अजय सिंदकर, स्थानिक नगरसेविका स्वाती शिंदे, सुजित राऊत तसेच तौफिक शिकलगार यांनीही स्थानिक नागरिकां ध्ये जनजागृती करीत खबरदारी घेण्याचे आवाहन केले. सायंकाळी या
परिसरात २०० मीटरचा कंटेन्मेंट झोन जाहीर करत परिसर सील करण्यात आला आहे.

Src test

AC NEWS RADIO l बाहेर पडताना काळजी घ्या l मास्क लावूनच बाहेर पडा l गर्दीत जाण्याचे टाळा l सैनी टायझर नेहमी जवळ ठ...