कोकरूड पोलीस ठाणे, संजीवनी हॉस्पिटल तसेच ग्राम पंचायातीद्वारे जन जागृती


कोकरूड पोलीस ठाणे, संजीवनी हॉस्पिटल तसेच 

ग्राम पंचायातीद्वारे जन जागृती 


कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन, घ्यावयाची काळजी, उपाययोजना यासाठी येथे आरोग्य केंद्र आणि ग्रामपंचायत यांच्यामार्फत जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. आरोग्य केंद्रामाफत गावातील
चौकाचोकांमध्ये या साथीविषयक बॅनर लावण्यात येत आहेत. कोकरुड पोलीस ठाण्याकडून तसेच संजीवनी हॉस्पिटल शेडगेवाडी यांच्याकडूनही जनजागृती केली जात आहे.
कोकरुड, बिळाशी, कुसाईवाडी, चिंचोली, माळेवाडी, मांगरुळ आदी गावांच्या ग्रामपंचायतीमार्फत नागरिकांना आवाहन केले जात आहे की, घाबरून जाऊ नका, स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी. वारंवार हात साबणाने धुवा, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये. या मोहिमेमध्ये कोकरुड परिसरातील प्रत्येक गावागावातील आरोग्य सेवक, सेविका यांनी देखील चांगलीच कंबर कसली आहे. गावातील नागरिकांनी आवश्यक असल्यासच बाहेर पडावे, राज्यात सध्या परिस्थिती आटोक्यात असली तरी काळजी घेणे गरजेचे आहे. घाबरुन जावू नये. वेळोवेळ आरोग्य विभागाने केलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. असे आवाहन आरोग्य सेविका आर. एस. देसाई यांनी केले आहे.

Src test

AC NEWS RADIO l बाहेर पडताना काळजी घ्या l मास्क लावूनच बाहेर पडा l गर्दीत जाण्याचे टाळा l सैनी टायझर नेहमी जवळ ठ...