अॅॅड. आर.आर. पाटील खरेदी विक्री संघात मका खरेदीस सुरवात
तासगाव : तासगाव येथील अॅड.आर.आर. पाटील शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ मर्या, तासगाव मार्केट यार्ड तासगाव दि. महाराष्ट्र स्टेट को ऑप. मार्केटिंग फेडरेशन लि. यांचे सब एजंट म्हणून २९ जूनपासून सुरू करण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अजितराव जाधव यांच्या हस्ते खरेदी केंद्राचे उदघाटन झाले.
या खरेदी विक्री संघात सन.२०१९-२० शासन आधारभूत किंमत योजनेतंर्गत मका खरेदीस सुरवात करण्यात आली. मार्केटला मका दर कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ लागले आहे. शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा, या उद्देशाने शासनाच्यावतीने माल खरेदी केंद्र सुरु झाले. शेतकऱ्यांनी सर्व प्रथम आपले नाव नोंदणी करावी. त्यानं माल खरेदी केला जाणार आहे शेतकऱ्यांनी आपली नावे नों द करण्यासाठी ७/१२, खाते उतारा पीकपाणी नोंद (१९.२० रब्बी मका) आधार कार्ड, बँक पासबुक पहिल्या पानाचे झेरॉक्स आदीसह माहिती घेऊन नाव नोंद करावे. त्यानंतरच माल स्विकारण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी संघाचे अध्यक्ष विलास वामन पाटील, उपाध्यक्ष तानाजीराव तात्या घाटगे, संचालक अमोल संपतराव पाटील, विलास आनंदा पाटील, वसंत तुकाराम पाटील, वेअर हाऊसचे धुमाळ, मार्केट कमिटी संचालक विवेक शेंडगे, बाळासाहेब गुरव, संघाचे व्यवस्थापक सगरे आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.