मेष :
आर्थिक आणि व्यावसायिक दृष्ट्या आजचा दिवस लाभदायक आहे. दीर्घकालीन आर्थिक नियोजन करू शकाल. व्यवसायात योजना आखाल. परोपकारी कार्यामुळे आपले मन प्रफुल्लित राहील. तब्बेत चांगली राहील. सदैव जनसंपर्कात राहावे लागेल. आजारी व्यक्तीच्या तब्बेतीत सुधारणा होईल. आर्थिक लाभाची अपेक्षा करू शकता. प्रतिस्पर्ध्यां बरोबरच्या संघर्षात विजय तुमचाच होईल.
वृषभ :
परिश्रमाच्या तुलनेत अल्प मोबदला मिळेल तरीही आपण निष्ठेने कार्य पुढे न्याल. कामाचा व्याप आणि आपली मधुर वाणी लोकांना प्रभावित करेल व त्यातून लाभ होतील. मुदूभाषा नवीन संबंध स्थापित करण्यात मदत करेल. कला, लेखन, वाचन यांत रुची वाढेल. विद्याभ्यासाला काळ अनुकूल आहे. बाहेर जेवण टाळा अन्यथा पचनाच्या तक्रारी येण्याची शक्यता आहे.
मिथुन :
बोलण्यात सुसूत्रता हवी. वेगवान घटनांचा दिवस. वाढीव खर्च ताण देईल. कार्यक्षेत्रात आपला प्रभाव वाढवणारा दिवस. समाजात मान-सन्मान, प्रतिष्ठा वाढेल. धनलाभाचे योग आहेत. नवीन कार्यासाठी उत्तम दिवस.
कर्क :
आहारविषयक पथ्ये पाळा. ताबा हवा. वेगळ्या विषयातून लाभ. हाती घेतलेले काम पूर्ण कराल. व्यापारी वर्गासाठी उत्तम दिवस. परदेशात राहणाऱ्या व्यक्तींकडून शुभ वार्ता मिळतील.
सिंह :
आर्थिक रचना उत्साह देईल. नवीन योजना कार्यान्वित होतील. चर्चेतून उत्तरे मिळतील. कोणालाही उधारी देऊ नका. खर्चावर नियंत्रण ठेवावे. हितशत्रूंचा त्रास होण्याची शक्यता आहे.
कन्या :
आरोग्य उत्तम राहील. मानसन्मानात वाढ होईल. भावनेच्या भरात वाहून नुकसान होण्याची शक्यता आहे. शेअर्समध्ये गुंतवणुक करु नका. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील.
तूळ :
आरोग्याची काळजी घ्या. अत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. अधिकार्यांपासून दूर राहा. धार्मिक कार्यांमध्ये खर्च होण्याची शक्यता आहे. मित्रांचे सहकार्य मिळाल्याने महत्त्वाची कार्य पूर्ण होतील.
वृश्चिक :
प्रेमसंबंधांमध्ये आवश्यक प्रगती होईल. आपल्या धाडसात वाढ होण्याची शक्यता आहे. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. आपल्या व्यवसायात काहीतरी चांगले घडून येणार आहे. आपल्या शत्रूंवर आपला प्रबळ प्रभाव राहील.
धनु :
निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा. एखाद्या गोष्टीवर डोळे मिटून विश्वास करू नये. आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींची काळजी घ्या. रोख रकमेची मोठी देवघेव टाळा. कलाक्षेत्रातील लोकांना अनुकूल परिस्थिती मिळेल.
मकर :
अत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. आरोग्य मध्यम राहील. वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा. वाहने काळजीपूर्वक चालवा. भावनाशील असल्यामुळे नुकसान होणे शक्य आहे. म्हणून मनावर नियंत्रण ठेवा. पैशाच्या बाबतीत आपली नड भागेल.
कुंभ :
अपेक्षित व्यक्तींचे सहकार्य मिळेल. नोकरदारांना अनुकूल वातावरण मिळेल. राजकारणी व्यक्तींना उद्देशात यश मिळेल. महत्त्वाची कामे यशस्वीरीत्या पूर्ण होतील. शत्रू पराभूत होतील. राजकीय व्यक्तींना काळ अनुकूल आहे. कौटुंबिक सुख वाढेल.
मीन :
पत्नीच्या आरोग्याची चिंता राहील. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा. सामाजिक कार्य काळजीपूर्वक करा. व्यापार-व्यवसायात जोखमीचे काम टाळा. नोकरदार कामात व्यस्त राहातील.
