सांगली शहरात नव्याने कोरोना दाखल : सिव्हील मधील ब्रदर कोरोना ग्रस्त : जिल्ह्यात १९ रूग्ण वाढले
सांगली : रविवारी सांगली जिल्ह्यात १९ रूग्ण वाढले आहेत. तर ५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण रुग्ण संख्या ३५८ वर पोहचली आहे. तर उपचारातील रूग्णसंख्या १२० झाली आहे. आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू तर ३ चिंताजनक आहेत. शिराळा खुर्द या गावातच नऊ रुग्ण आढळून आल्याने हे गावही आता कोरोना हॉटस्पॉट बनले आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय साळुंखे यांनी दिली.
सांगलीतील वसंतदादा सर्वोपचार रूग्णालयातील अस्थिव्यंग विभागात कार्यरत असणारा ब्रदर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तर तपासणी नंतर त्याचा सहकारी ब्रदरही पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यामुळे सांगली शहरातील रूग्णसंख्या आणखीन एकाने वाढली आहे. हे दोघे ब्रदर सम्राट व्यायाम मंडळाजवळ एकाच रूममध्ये राहत होते.
शिराळा तालुक्यातील शिराळे खुर्द येथे नऊ रूग्ण वाढले आहेत. यामध्ये ४५ वर्षाची महिला, ३० वर्षाची महिला, १९ वर्षाची मुलगी, ३५ वर्षाची महिला, १४ वर्षाचा मुलगा, १६ वर्षाचा मुलगा, २८ वर्षाची व्यक्ती, ४५ वर्षाची व्यक्ती आणि ८७ वर्षाची व्यक्ती असे नऊ रूग्ण वाढले आहेत. एकाच कुटुंबांशी संपर्कातील या व्यक्ती आहेत. शिराळे खुर्द हे गाव आता जिल्ह्यातील दुसरे कोरोना हॉटस्पॉट बनले आहे. शिराळा तालुक्यातील मणदूर या गावानंतर शिराळे खुर्द या गावात रूग्ण संख्या वेगाने वाढत चालली आहे.
दुधोंडी, पुणदी, कोकरूड, बिळूर, बावची येथे रूग्ण वाढले पलूस तालुक्यातील धोंडी येथील त्या राजकीय नेत्यांच्या संपतिील ४६ वर्षाची व्यक्तीही पॉझिटिव्ह आली आहे. पुणदी येथील ३५ वर्षीय व्यक्तीही तसेच जत तालुक्यातील बिळूर येथील ४५ वर्षीय व्यक्ती, तासगाव तालुक्यातील वाघापूर येथील २२ वर्षीय महिला, वाळवा तालुक्यातील बावची येथील २४ वर्षीय युवक पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तर शिराळा तालुक्यातील कोकरूड येथील ३० वर्षीय महिला आणि ११ वर्षाचा मुलगा तसेच ढाणेवाडी येथील ६० वर्षीय व्यक्ती, निगडी येथील २४ वर्षीय महिला असे एकण १९ जणांचे अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आले आहेत. या सर्वांच्यावर मिरजेच्या कोरोना रूग्णालयात उपचार सुरू कर ण्यात आले आहेत.
रविवारी पाच जण कोरोना मुक्त झाले आहेत. त्यामध्ये पलूस येथील ८८ वर्षीय व्यक्ती, ६७ वर्षीय महिला, शिराळा तालुक्यातील पुणदी येथील ८५ वर्षाची महिला, खानापूर तालुक्यातील भाळवणी येथील ६ वर्षीय महिला आणि जत तालुक्यातील निगडी येथील ३८ वर्षीय व्यक्ती असे एकूण पाच जण कोरोना मुक्त झाले आहेत.
