शिरोळ तालुक्यातील हरोली येथे वायरमन चा मृत्यू : जोडणीचे काम करत असताना घडली दुर्घटना
तरुण वायरमनचा दुर्दैवी अंत : परिसरात हळहळ
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्या च्या शिरोळ तालुक्यातील हरोली येथे विजेच्या धक्क्याने वायरमन चा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडलीय. सौरभ कांबळे वय वर्षे 25असे या वायरमन चे नाव आहे. तो सहकारी जगताप यांच्यासह एका शेतात जोडनीचे काम करण्यासाठी गेला होता. जोडणी करण्यासाठी खांबावर चढून जोडणी करत असताना त्याला अचानक विजेचा झटका बसला. या झटक्याने तो जागीच मरण पावला.
तरुण वायरमन चां असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.