सांगली महापालिकेची आपत्ती व्यवस्थापन तयारीची प्रबोधन फेरी: आपत्कालीन वाहनासहीत सांगली मिरजेतून निघाली प्रबोधन फेरी
सांगली : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशानुसार आज आपत्ती व्यवस्थापन विभागांतर्फे प्रबोधन फेरी काढण्यात आली.
महापुराच्या पार्श्वभूमीवर संभाव्य आपत्ती, सुरक्षा, बचाव आणि सुटका पथकाची तयारी दर्शवण्यासाठी तसेच त्यासाठी सज्ज असलेली सर्व साधन सामुग्री/यंत्रणा आणि आपत्ती मित्र यांच्यासह प्रबोधन फेरी काढण्यात आली. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी या प्रबोधन फेरीचे नेतृत्व केले.
मिरज शहरातून सुरू झालेली ही रॅली सांगली मिरज रोडवरून सांगली शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. याशिवाय येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर आपत्कालीन साहित्य आणि तयारीची प्रत्यक्षिकेही यावेळी सादर करण्यात आली.