कोल्हापूर: कोल्हापूरातील करवीर तालुक्यातील शिये परिसरात दोन दिवसापूर्वीच स्टोन क्रशर विभागातील एक मजूर कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायतीने क्रशर विभाग पाच दिवस पूर्णपणे बंद ठेवला. त्यातच एका वृत्तपत्र संस्था मध्ये नोकरी करणाऱ्या गावातील एका तरुण पॉझिटिव्ह आल्याने गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं. गावातील ग्रामपंचायत , प्राथमिक आरोग्य विभागाने पाटील गल्ली प्रतिबंधित करून त्या पॉझिटिव्ह तरुणाच्या संपर्कात आलेल्या सहा व्यक्तींना स्वॅब घेण्यासाठी सीपीआर हॉस्पिटलला पाठवले. त्यानंतर पाटील गल्ली ते ग्रामपंचायत चौक पर्यत निर्जंतुकीकरण औषध फवारणी करण्यात आली. गावातील दक्षता समितीने ग्रामपंचायत इथं बैठक घेऊन अत्यावश्यक सेवा वगळता खबरदारी म्हणून पूढील तीन दिवस लॉकडाउन करणायचा निर्माण ग्रामपंचायत घेतला आहे.

Src test

AC NEWS RADIO l बाहेर पडताना काळजी घ्या l मास्क लावूनच बाहेर पडा l गर्दीत जाण्याचे टाळा l सैनी टायझर नेहमी जवळ ठ...