मिरजेत १ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान धार्मिक कार्यक्रमांची मांदियाळी



मिरजेत १ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान धार्मिक कार्यक्रमांची मांदियाळी : पहिल्यांदाच भरणार देशभरातील साधुसंतांचा कुंभमेळा


मिरज : मिरजेत १ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबर २०२० दाम्बान पितृ मोक्ष प्रीत्यार्थ ५ हजार जोडप्यासाठी श्रीमत भागवत पारायण वाचन सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जगदूरु सूर्याचार्य श्री कामदेव नंदगिरी महाराज यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत भारताने दिली. याचबरोबर मिरज कृष्णा घाट येथील पुरातन आणि ऐतिहासिक मार्तंड ऋषींच्या मंदिरचे पुनर्निर्माण आणि जीर्णोद्धार केला जाणार असून यानिमित्ताने मिरज नगरीत पहिल्यांदाच देशभरातील साधू संताचा हा कुंभमेळा भरवण्याचा संकल्पही जगद्गुरू सूर्य आचार्य श्री कृष्णदेव नीलगिरी महाराजांनी सोडला आहे. यावेळी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे उपस्थित होते.






याबाबत बोलताना जगद्गुरू सूर्य आचार्य श्री कृष्णदेव नीलगिरी महाराज म्हणाले कि, मिरज येथील कृष्णाघाट येथील मार्तंड ऋषींच्या मंदिराचा पुनर्निर्माण आणि जिर्णोदार करण्याचे काम आम्ही हाती घेत आहोत. यासाठी १ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबर २०२० या दरम्यान मिरज कृष्णाघाट परिसरातील मार्तंड ऋषींच्या मंदिर परिसरात भव्य दिव्य आणि नेत्रदीपक अशा श्रीमंत भागवत पारायण वाचन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात ५ हजार पतिपत्नी सहभागी होणार असून हा सोहळा सात दिवस चालणार आहे. पितृ मोक्ष प्रीत्यार्थ हा सोहळा आयोजित करण्यात आल्याचेही जगद्गुरू सूर्य आचार्य श्री कृष्णदेव नंदगिरी महाराजांनी सांगलीत बोलताना सांगितले. याचबरोबर या भव्य सोहळ्यास देशभरातील आणि देशाबाहेरून सुद्धा जगाच्या कानाकोपर्यातून साधू संत उपस्थित राहणार असून यामुळे पहिल्यांदाच मिरज नगरीच्या भूमीत आणि मातंग ऋषींच्या मंदिराच्या परिसरात देशभरातील साधू संतांचा मिनी कुंभमेळा करण्याचा संकल्प यावेळी सोडण्यात आला आहे.






या निमित्ताने मिरज कार्यक्रमस्थळी देशाचे रक्षण करणारा सैनिकांसाठी रक्तदान शिबीर आयोजित केले जाणार आहे. याचबरोबर याच परिसरात अल्प दरात मिरजेत भक्त निवास बांधण्याची संकल्पना सुद्धा जगद्गुरू सूर्याचार्य महाराजांनी यावेळी बोलून दाखवली. मिरजेत पहिल्यांदाच असा नेत्रदीपक सोहाळा भाविकांना पाहायला मिळणार आहे. या सोहळ्याची तयारी सुरु झाली असून या नेत्रदीपक सोहळ्याचे आपण सगळे साक्षीदार बनावे आणि हा कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहनही जगदुरू सूर्य आचार्य श्री कृष्णदेव नीलगिरी महाराजांनी पत्रकार परिषदेत केला आहे. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते मनुभाई सारडा, माजी उपमहापौर ये. धीरज सूर्यवंशी, श्रीकांततात्या शिंदे , मिरजेचे युवकनेते तानाजी सातपुते गजेंद्र कल्लोळी हणमंतराव पवार, लता शहा , पीडी चव्हाण, प्रताप कदम आदी प्रयत्नशील आहेत. या संपूर्ण सोहळ्याचे संयोजन मिरजेचे सरकार गोपाळराजे पटवर्धन आणि मार्तंड मंदिराचे विश्वस्त राजन गळदगे गुरुजी आणि शिवप्रतिष्ठानचे धारकरी करत आहेत असेही जगद्गुरु सूर्याचार्य कृष्णदेव नंद गिरीजी महाराज यांनी सांगितले. 


Src test

AC NEWS RADIO l बाहेर पडताना काळजी घ्या l मास्क लावूनच बाहेर पडा l गर्दीत जाण्याचे टाळा l सैनी टायझर नेहमी जवळ ठ...