राष्ट्रवादी कॉंग्रेस शहर जिल्ह्याच्या वतीने पोलीस कोरोना योद्ध्यांचा सत्कार
सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहर जिल्हाच्या वतीने कोरोनाशी लढा देण्यासाठी २४ तास कार्यरत सांगली पोलीस दलातील कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी सांगलीचे डी वाय एस पी. अशोक वीरकर,, मिरज चे डी वाय एस पी संदीप सिंह गिल, सांगली शहरचे पोलीस निरीक्षक सुंदर साहेब, विश्रामबाग पोलीस स्टेशनचे तनपुरे साहेब , सांगली ग्रामीण चे पोलीस निरीक्षक चंद्रकांत बिंद्रे साहेब संजय नगर पोलीस स्टेशनचे काकासाहेब पाटील साहेब, कुपवाड चे साहाय्यक पोलीस निरीक्षक उबाळे साहेब यांचा सत्कार शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज , विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुल दादा पवार यांच्या हस्ते कोरोना योद्धा मानपत्र देऊन गौरवण्यात आले .यावेळी नगरसेवक सांगली शहराध्यक्ष सागर दादा घोडके, मिरज शहराध्यक्ष अभिजीत हारगे, कुपवाड शहराध्यक्ष संजय तोडकर, महिला अध्यक्ष विनय पाठक, अनिता पागंम, वंदना चंदनशिवे यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे स्वागत अल्पसंख्याक शहरजिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक आयुब बारगीर यांनी केले तर आभार सचिन जगदाळे यांनी मानले.