राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे रुग्ण वाहिका चालकांचा सत्कार
सांगली : कोरोनाच्या महामारीत जीव जोखमीत घालून आणि कुठेही कोरोना रुग्ण सापडला तर त्या रुग्णाला आपल्या रुग्णवाहिकेत बसून मिरज सिव्हीलच्या आयसोलेशन वॉर्ड पर्यंत असणाऱ्या महापालिकेच्या रुग्णवाहिका चालकांचा राष्ट्रवादीकडून सन्मान करीत त्यांच्या कामाचे कौतुक केले. यावेळी आयुब बारागिर, आयुब मुल्ला, युसूफ जमादार अकबर शेख आदीनी रुग्णवाहिका चालक लाला मुरसल आणि वैभव चोरमले, शिवानंद कदम यांचा सत्कार करीत त्यांच्या कर्तुत्वाचा गौरव केला.