सर्वमंगल ग्रुप देणार नवउद्योजकांना हक्काचे व्यासपीठ

 सर्वमंगल ग्रुप देणार नवउद्योजकांना हक्काचे व्यासपीठ  
सांगलीत सर्वमंगल एक्स्पो 2021चे आयोजन
नगरसेविका अँँड स्वाती शिंदे यांचे प्रमुख उपस्थितीत होणार उद्घाटन


कोरोनाच्या जागतिक संकटाने अनेक जण बेघर झाले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर अनेकांचे व्यवसाय बंद झाले. पण याच कालावधीत आणि त्यानंतर नव्या जिद्दीने आणि  साहसाने आपला घरगुती व्यवसाय नव्याने सुरू करणाऱ्या नव उद्योजकांना सौ नेहा दातार यांनी एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

सर्वमंगल ग्रुप यानावाने कार्यरत या व्यासपीठाच्या माध्यमातून दि २३ व २४ जानेवारी रोजी  शॉपिंग फेस्टिवल या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

विश्रामबाग येथील बी एस एन एल ऑफिस शेजारील  ऋतुरंग हॉल येथे आयोजित या प्रदर्शनाचे उदघाटन नगरसेविका अँँड. सौ स्वाती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत  २ दिवस सुरू असणाऱ्या या प्रदर्शनात 50 हुन अधिक स्टॉल लावण्यात येणार आहेत, अशी माहिती सौ नेहा दातार यांनी दिली. 

माहिती देताना त्या म्हणाल्या, सर्वमंगल ग्रुपने अत्यंत कमी कालावधीत सर्वांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. घरगुती स्वरूपातील व्यवसाय असोत वा कोणताही सण असो सर्वकाही एकाच छताखाल येथे उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे कोरोनातील संकटकाळी देखील या सर्वमंगलच्या सहाय्याने छोट्या छोट्या नव्या कौटुंबिक   व्यवसायिकांनी गरूड भरारी घेतली आहे, असे  सौ नेहा दातार अभिमानाने सांगतात.घरच्याघरी केक, बिस्किटे, कुकीज, चॉकलेट तसेच घरगुती शिलाई करून नाविन्यपूर्ण ड्रेस तयार करणाऱ्या सर्वांना हे व्यासपीठ खुले करण्यात आले आहे.  १० वर्षांहून अधिक अनुभव असणाऱ्या सौ दातार यांनी सांगितले की, घरगुती उत्पादन आपण तयार करतो परंतु त्याला योग्य ती बाजारपेठ तसेच चोखंदळ ग्राहक मिळत नाही परिणामी असे उद्योग लयास जातात यासाठीच या ग्रुपची स्थापना करण्यात आली आहे. सांगली सोबत सातारा, कोल्हापूर, पुणे, मुंबई तसेच महाराष्ट्रातून अनेकजण या ग्रुपचे सदस्य झाले आहेत त्यामुळे प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. आजपर्यंत जवळपास१० हजारहून अधिक व्यक्तींचा सहभाग या ग्रुप मध्ये झाला आहे.

सर्वमंगल ग्रुपच्या माध्यमातून दि २३ व २४ जानेवारी रोजी  शॉपिंग फेस्टिवल या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत  २ दिवस सुरू असणाऱ्या या प्रदर्शनात 50 हुन अधिक स्टॉल लावण्यात येणार आहेत, यामध्ये आकर्षक अँटिक ज्वेलरी, कॉस्मेटिक वस्तू, घर सजावटीच्या नाविन्यपूर्ण वस्तू यांचा समावेश आहे.संक्रांतिनिमित्त हळदी कुंकू व वाण देण्याचा कार्यक्रम होणार असुन दु १ ते ३ वाजेपर्यंत सर्व महिलांना मोफत मेहंदी काढून देण्यात येणार आहे. याचसोबत डिझायनर साड्या, ड्रेस मटेरियल, वेस्टर्न पद्धतीचे कपडे, त्याचप्रमाणे पुरुषांसाठी रेडिमेड शर्ट, कुर्ता, टी शर्ट, तसेच लहान मुलांसाठी फॅन्सी कार्टून चे टी शर्ट, खेळणी अन् बरेच काही एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे.तसेच अधिकाधीक बक्षिसांची उधळण लकी ड्रॉ घेण्यात येणार आहे. खास खवय्यांसाठी रुचकर सोलकढी, चवदार कुंफु डोसा, खमंग चिनी डोसा, खुसखुशीत चॅट पदार्थांची मेजवानी उपलब्ध आहे. सोबत नृसिंहवाडी च्या बासुंदीचा मनमुराद आस्वाद याठिकाणी घेता येणार आहे. कोरोनाकरीता  खबरदारी म्हणून मास्क व सॅनिटायजर्स शिवाय प्रवेश निषिद्ध करण्यात आला आहे.

 या प्रदर्शनास अनेकांनी भेट देऊन नाविन्यपूर्ण वस्तूचा लाभ घ्यावा असे आवाहन  सौ नेहा दातार यांनी केले आहे.  एकंदरीत सौ दातार यांची धडपड बघून नगरसेविका सौ स्वाती शिंदे यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत भाजपाच्या सांस्कृतिक विभागाच्या उपाध्यक्षपदी सौ नेहा दातार यांची निवड केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर सर्वच ठिकाणी कौतुकाचा वर्षाव होत आहे.


Src test

AC NEWS RADIO l बाहेर पडताना काळजी घ्या l मास्क लावूनच बाहेर पडा l गर्दीत जाण्याचे टाळा l सैनी टायझर नेहमी जवळ ठ...