आटपाडीमध्ये सिद्धनाथ तैलचित्राचे अनावरण

 

नवोदित चित्रकार प्रतीक अभंगराव यांच्या कलेचे कौतुक

आटपाडी : खरसुंडी (ता. आटपाडी) येथील सिद्धनाथांच्या तैलचित्राचे अनावरण जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांच्याहस्ते करण्यात. आले. खरसुंडी येथील नवोदित चित्रकार प्रतीक अभंगराव यांनी हे चित्र रेखाटले आहे.

यावेळी दिघंचीचे सरपंच अमोल मोरे, सदस्य बाळासाहेब होनराव, युवा सेना अध्यक्ष संतोष पुजारी, राजेश नांगरे, देवस्थान टस्टचे अध्यक्ष चंद्रकांत पुजारी, विश्वस्त विजयकुमार भांगे, माजी सरपंच अर्जुन सावकार, मोहन शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी तानाजी पाटील यांनी चित्रकार अभंगराव यांच्या कलेचे कौतुक करून भविष्यात मदत करण्याची ग्वाही दिली. सूत्रसंचालन विनोद पुजारी यांनी केले.


Src test

AC NEWS RADIO l बाहेर पडताना काळजी घ्या l मास्क लावूनच बाहेर पडा l गर्दीत जाण्याचे टाळा l सैनी टायझर नेहमी जवळ ठ...