अनुरूप, सुशिक्षित जोडीदार हवा : मराठा वधू-वर मेळाव्यात तरुणींच्या अपेक्षा


सांगली : निव्यर्सनी, सुशिक्षित, उत्तम नोकरी, थोडी शेती व व्यवसाय करणारा अनुरूप जोडीदार हवा, अशी अपेक्षा मराठा समाजच्यावतीने आयोजित वधू - वर मेळाव्यात सहभागी युवतींनी व्यक्त केल्या. तर लग्न करताना जोडीदाराची पत्रिका बघणार नाही, असेही मत बहुसंख्य वधू-वरांनी यावेळी व्यक्त केले.

मराठा समाज सांगली यांच्यावतीने २३५ वा मराठा समाज वधू -वर व पालक परिचय मेळावा झाला. कोरोनामुळे दीड वर्षानंतर प्रथमच आज हा मेळावा झाला. वधू-वरांसह पालक उत्स्फूर्त सहभागी झाले होते.

संस्थेचे माजी अध्यक्ष रघुनाथ पाटील यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दरम्यान, मनमिळावू, पदवीधर, कुटुंबाला सांभाळणारी मुलगी असावी, अशा अपेक्षा मुलांनी व्यक्त केल्या. मराठा समाजचे अध्यक्ष अभिजित पाटील, उपाध्यक्ष ए. डी. पाटील, सरचिटणीस प्रमोद शिंदे, विकास मोहिते, अँड. विलासराव हिरुगडे, शशिकांत जाधव, दत्तात्रय सावंत, संभाजीराव पाटील - सावर्डेकर, बाबासाहेब भोसले, डॉ. मोहन पाटील उपस्थित होते.


Src test

AC NEWS RADIO l बाहेर पडताना काळजी घ्या l मास्क लावूनच बाहेर पडा l गर्दीत जाण्याचे टाळा l सैनी टायझर नेहमी जवळ ठ...