सांगली : जिल्ह्यात १५ ते १८ वयोगटातील युवक, युवतींसाठी कोव्हिड प्रतिबंधक लसीकरणाचे नियोजन करावे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी प्रशासनाला दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोव्हिड-१९ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने जिल्हा समन्वय समितीची आढावा बैठक डॉ. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. बिवेक पाटील उपस्थित होते.
डॉ. चौधरी म्हणाले, जिल्ह्यात १५ ते १८ या वयोगटातील सुमारे १ 'लाख ३७ हजार युवक-युवतींची संख्या आहे. त्यांच्या लसीकरणासाठी शाळा, महाविद्यालये उपयुक्त अशा जागांची निश्चिती करून या ठिकाणी लसीकरण कक्ष सुरू करण्यासाठी तयारी ठेवावी. तसेच १८ वर्षांवरील लोकांनी आतापर्यंत ६५.३८ टक्के लोकांचा दुसरा डोस घेतला आहे. ७९.९ टक्के लोकांचा पहिला डोस झालेला आहे.
त्याचप्रमाणे
ज्या गावांमध्ये लसीकरणाची टक्केवारी ५० टक्केपेक्षा कमी आहे, अशी गावे
वशहरातील भाग निश्चित करून या ठिकाणी दोन ते तीन दिवसांचे लसीकरण शिबिर आयोजित करावे आणि प्राधान्याने लसीकरण करावे, असे आदेश जिल्हाधिकारी
डॉ. अभिजित चौधरी यांनी प्रशासनास दिले आहेत. जानेवारी महिन्यात विशेष लसीकरण मोहीम
राबविण्यात येणार आहे.