सोलापूर-कराड एक्सप्रेस मिरजमार्गे सुरू करा : प्रकाश जमदाडे

 

जत : सोलापूर - मिरज – सातारा या मार्गावर सोलापूर पंढरपूरहून  सांगली - कराड – सातारा जाणारी एक ही रेल्वे नाही. ही प्रकाश जमदाडे रेल्वे मिरजमार्गे सुरू करण्याची मागणी जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली.

केंद्रीय मंत्री दानवे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, सोलापूर - कराड एक्सप्रेस, कुर्डूवाडी - मिरज पॅसेंजर, पंढरपूर - सातारा पॅसेंजर (मिरज मार्गे), कु्डूबाडी- कराड पॅसेंजर, पंढरपूर -कराड पॅसेंजर, पंढरपूर- सांगली पॅसेंजर, सोलापूर- सांगली पॅसेंजर या रेल्वेगाड्या सुरू झाल्यास पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांची सोय होईल. तसेच सांगली - सोलापूर - सातारा जिल्ह्याचा गतीने विकास होईल. तरी सोलापूर, पंढरपूर येथून सांगली-कराड- सातारा (मिरज जंक्शन मार्गे) ही रेल्वे सुरू करण्यात याबी. तसेच कोल्हापूर - सोलापूर एक्स्प्रेस बंद आहे. कोल्हापूर बेळगाव, मिरज येथून अनेक प्रवासी पंढरपूरला जातात. त्यांच्यासाठी ही गाडी सोयीची आहे. त्यामुळे ही गाडी लवकरात लवकर सुरू करून त्याच्या फेऱ्या बाढबाव्यात, असेही जमदाडे यांनी म्हटले आहे.


Src test

AC NEWS RADIO l बाहेर पडताना काळजी घ्या l मास्क लावूनच बाहेर पडा l गर्दीत जाण्याचे टाळा l सैनी टायझर नेहमी जवळ ठ...