मोदींना २०२४ मध्ये जनताच घरी बसवेल

 

सांगली : लोकांच्या योगदानामुळे आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने भारत

स्वतंत्र केला. हे काँग्रेस पक्षाचे कधीही न फिटणारे क्रण आपल्यावर आहेत. नेते निमित्तमात्र आहेत. जी कामे होतात त्याचे सारे श्रेय काँग्रेस पक्षाला आहे. पक्षाने घडवलेला देश मोदी विकत आहेत. महागाईने लोक त्रस्त आहेत. त्यामुळे २०२४ मध्ये जनताच मोदींना घरी बसवेल, असे प्रतिपादन जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केले.

येथील काँग्रेस भवनमध्ये काँग्रेस पक्षाच्या १३७वा वर्धापनदिन व काँग्रेस सेवा दलाच्या स्थापनादिन कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी ध्वजवंदन, बंदेमातरम्‌, झेंडा गीत व राष्ट्रगीत गायन आणि सेवा दलाचे संस्थापक नारायण हर्डीकर व म. गांधी यांच्या प्रतिमेला पाटील यांच्याहस्ते, तर स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस प्रा. एन. डी. बिरनाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी प्रास्ताविकात काँग्रेस व सेवा दलाची वाटचाल ब योगदान माहिती दिली.

प्रा. बिरनाळे म्हणाले, काँग्रेस पक्षामुळे देशाचा चौफेर विकास झाला आहे. कृषिप्रधान भारत काँग्रेसने मजबूत केला आहे. पंडित नेहरू, पटेल, गांधी, बोस व अनेक कुटुंबीयांच्या त्यागातून हा देश उभा राहिला आहे. पक्षाच्या असंख्य नेत्यांनी रक्त सांडून स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. यासाठी 'घर घरमे काँग्रेस मन मन मे काँग्रेस, तिरंगा बचाव' अभियान राबवूया.

यावेळी अशोक वारे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच कालीचरण साधूंनी महात्मा गांधी यांच्याबद्दल अनुद्गार काढल्याने त्यांचा निषेध ठराव बाबगोंडा पाटील यांनी मांडला. यावेळी काँग्रेस व सेवा दलाच्या वतीने कालीचरण साधूचा जाहीर निषेध करण्यात आला.

यावेळी अल्लाबक्ष मुल्ला, अरुण पळसुले, सुभाष पट्टणशेट्टी, आयुब निशाणदार, विठ्ठल काळे, हणमंत यादव, शमशाद नायकवडी, जन्नतबी नायकवडी, रामलिंग परदेशी, अशोक रजपूत, सुनीता मदने, नीलम कांबळे, सुजाता सूर्यवंशी उपस्थित होत्या. काँग्रेस सेवा दलाचे अरुण पळसुले यांनी स्वागत केले.


Src test

AC NEWS RADIO l बाहेर पडताना काळजी घ्या l मास्क लावूनच बाहेर पडा l गर्दीत जाण्याचे टाळा l सैनी टायझर नेहमी जवळ ठ...