सांगलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक

 

सांगली : कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ सांगलीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज व राहुल पवार यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करण्यात आला.

शहराध्यक्ष संजय बजाज म्हणाले की, ही घटना अतिशय संतापजनक घटना आहे. त्याचा मी जाहीर निषेध

करतो. कर्नाटक सरकारने यामध्ये दोषी असलेल्या व्यक्तींवर कडक कारवाई करावी.

युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमची अस्मिता आहे. आमच्या अस्मितेचा कोणी अपमान करत असेल तर आम्ही हे सहन करणार नाही. अशा विकृत लोकांना

कर्नाटक सरकारने पाठीशी घालू नये, या समाजकंटकांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.

यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, पद्माकर जगदाळे, शेखर माने, सागर घोडके, सचिन जगदाळे, अनिता पांगम, वंदना चंदनशिवे, विष्णू माने आदी उपस्थित होते.

Src test

AC NEWS RADIO l बाहेर पडताना काळजी घ्या l मास्क लावूनच बाहेर पडा l गर्दीत जाण्याचे टाळा l सैनी टायझर नेहमी जवळ ठ...