तासगाव : येथील शिवार कृषी प्रदर्शनामध्ये पशुप्रदर्शाला आता चांगलीच रंगत आली. आहे. डोंगशोनंतर आता. विविध जातीची बैल, गाव, रेडा, म्हैस बघून लोक अवाक होत आहेत. मात्र यासोबतच याठिकाणी आलेला सोळाशे किलो वजनाचा रेडा मात्र सर्वाचे लक्ष वेधून घेवू लागला आहे.
तब्बल ८० लाख रुपयांना मागणी येऊनही संबंधित शेतकऱ्याने हा रेडा विकला नाही. मुरा जातीचा हा रेडा
मंगसुळी (ता. कागवाड, जि. बेळगाव) येथील विलास नाईक यांचा आहे. चार वर्षे वय असलेला हा रेडा सध्या शिवार कृषी प्रदर्शनाचे आकर्षण ठरला आहे. याबाबत शेतकरी नाईक यांनी सांगितले की, या रेड्याला खुराक म्हणून रोज किमान १५ लिटर दुध, भरडा तसेच अन्य खाद्य द्यावे लागते. या रेड्याला तब्बल ८० लाख रूपयांना मागणी आली होतो. मात्र आपण तो विकणार नसल्याचे सांगितले. सध्या तासगावसह परिसरातून या रेड्याला पहाण्यासाठी एकच गर्दी होवू लागली आहे.