दानोळीच्या युवकाचा पैशाच्या वादातून खून

 

जयसिंगपूर : पैसे देण्याच्या कारणावरून प्रशांत संजय भिसे (वय २८, दानोळी, ता. शिरोळ) या युवकाचा धारदार शस्त्राने खून करून कोथळी (ता. शिरोळ) गावच्या हद्दीत कचरा डेपोमध्ये मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला; पण अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळूत आल्याने दानोळी, कोथळी परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी प्रताप ऊर्फ गुंड्या संजय माने, अमोल ऊर्फ दाद्या दत्ता हराळे व सागर अजित होगले (सर्व रा. दानोळी) यांच्या विरोधात सुशांत संजय भिसे यांनी जयसिंगपूर पोलिसांत फिर्याद दिली आहे.

प्रशांत भिसे याच्यासह माने, 'होगले, हराळे तिघे संशवित जेवण्यासाठी गेले होते. यावेळी पैसे देण्यावरून वादावादी झाली. त्यामुळे संशयितांनी संगनमत करून प्रशांत याचा धारदार शस्त्राने खून केला. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने कोथळी येथील गायरान जमिनीवर असलेल्या कचरा डेपोमध्ये टाकून मृतदेह जाळण्याचा प्रवत्न केला. मात्र, मृतदेह अर्धवट जळलेला राहिला. त्याचबरोबर प्रशांतची मोटारसायकल दानोळी येथील खर्डेकर सरकार यांच्या विहिरीत टाकून नष्ट करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, बुधवारी रात्री दोनपासून प्रशांत भिसे हा बेपत्ता असल्याची नोंद गुरुवारी जयसिंगपूर पोलिसात करण्यात आली होती. त्यानंतर रोहित दाभाळे, पोलिसपाटील प्रशांत नेजकर यांच्यासह ग्रामस्थांना दानोळी-जयसिंगपूर रोडवरील खर्डेकर यांच्या विहिरीत प्रशांतची मोटारसायकल आढळून आली. ही माहिती जयसिंगपूर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी दोरखंडाच्या सहाय्याने गाडी बाहेर काढली, शिवाय ४० फूट खोल असलेल्या विहिरीतील पाणी तीन मोटर लावून उपसण्यात आले. पण प्रशांतचा पत्ता लागला नव्हता. शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास कोथळी येथे मंगोबा देवालय स्स्त्ालगत कचऱ्याच्या ढिगाऱ्यात प्रशांतचा अर्धवट जळालेला मृतदेह मिळून आल्याने खळबळ उडाली.

Src test

AC NEWS RADIO l बाहेर पडताना काळजी घ्या l मास्क लावूनच बाहेर पडा l गर्दीत जाण्याचे टाळा l सैनी टायझर नेहमी जवळ ठ...