तुंग येथील घटना; मेंढपाळांना सतर्क राहण्याची सूचना
कसबे डिग्रज : तुंग (ता. मिरज) येथे शेळ्यांच्या 'कळपावर गुरुवारी लांडग्यांच्या हल्ल्यात १७ शेळ्या ठार झाल्या. दोन शेळ्या गंभीर जखमी झाल्या.
येथील बाळू यादव यांच्या शेतात मेंढपाळ सुमारे अडीचशे शेळ्यां- मेंढ्यासह मुक्कामास आहेत. गुरुवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास लांडग्यांनी हल्ला केला. शेळ्यांच्या ओरडण्याने वस्तीवर आसलेल्या गजानन आरगे, शीतल आरे, प्रकाश भानुसे यांनी त्या तीन बन्यप्राण्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी त्यांच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी प्रसंगावधान राखून धाडसाने त्यांना हुसकावले. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. या हल्ल्यात १७ शेळ्या ठार झाल्या तर दोन गंभीर जखमी झाल्या आहेत.
वनविभागाचे अधिकारी युवराज पाटील, वनरक्षक दत्तात्रय भोसले, पोलिस पाटील श्रृती गुरव, तंटामुक्ती
समितीचे अध्यक्ष धनाजी भानुसे, पशु वैद्यकीय अधिकारी कुलकर्णी यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. जखमी दोन शेळ्यांवर पशुवैद्यकीय अधिकारी यांनी औषधोपचार केले.