सांगली : हिंदकेसरी पै. मारुती माने (भाऊ) यांच्या ८३ व्या जयंतीनिमित्त सांगली जिल्हा शारीरिक शिक्षक संघटना यांच्यावतीने सांगली महापालिकेसह जिल्ह्यातील ११० क्रीडा शिक्षकांचा सत्कार महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उपमहापौर उमेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सांगली हायस्कूलच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमोद पाटील उपस्थित होते.
सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी करून राज्य, राष्ट्रीय खेळाडू घडवणार्या शिक्षकांच्या कार्याची दखल घेऊन सांगली जिल्हा शारीरिक शिक्षक संघटना यांच्या बतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष जनार्दन झेंडे, उपाध्यक्ष जितेंद्र पाटील, अशोक पाटील, सुधाकर माने, परशुराम लोंढे,
उदय गायकवाड,
राजेंद्र पाटील, यशवंत चव्हाण, शहाजी खरमाटे, बिजय बिराजदार
उपस्थित होते.