शिवपुतळ्याची बंगळुरात विटंबना : समाजकंटकांविरोधात संतापाची लाट

 

बंगळूर : बंगळुरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली. कोल्हापुरत  लाल-पिवळा जाळल्याने कन्नडिगांचा तीळपापड होत आहे. यातूनच काही समाजकंटकांनी हे कृत्य केल्याचा अंदाज आहे.

सँकी-टँकी रोडवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. गुरुवारी रात्री काही समाजकंटकांनी त्याची विटंबना केली. याबाबतचा व्हिडीओ काही तासांतच व्हायरल झाला. त्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली. ठिकठिकाणी या प्रकाराचा निषेध करण्यात आला,

 

बेळगावात कर्नाटक विधिमंडळ अधिवेशन भरवले जाते. त्यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून महामेळाव्याचे आयोजन केले जाते, महामेळाव्याला परवानगीपासून तो संपेपर्यंत पोलिस आणि जिल्हा प्रशासनाकडून आडकाठी केली जाते. अशा परिस्थितीतही महामेळावा यशस्वी होतो. यामुळे पोटशूळ उठलेल्या काही कन्नड संघटनांच्या कार्यकत्यांनी मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर शाई फेकली. याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. कोल्हापुरात लाल-पिवळा जाळण्यात आला. याचा सूड म्हणून काही कन्नड संघटनांनी चित्रदुर्ग येथे भगवा ध्वज जाळला. कन्नडिगांची मजल पुतळा  बिटंबनापर्यंत गेली आहे. त्या विरोधात संतापाची तीव्र लाट उमटली आहे. या समाजकंटकांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Src test

AC NEWS RADIO l बाहेर पडताना काळजी घ्या l मास्क लावूनच बाहेर पडा l गर्दीत जाण्याचे टाळा l सैनी टायझर नेहमी जवळ ठ...