मिरज : मिरज तालुक्यातील करोली (एम) येथे सरपंच वस्ती, हणमंत वस्ती या ठिकाणी अनेक भटक्या कुत्र्यांना विषबाधा झाल्याचे आढळून आले आहे. त्यापैकी नऊ कुत्र्यांना लकवा मारला असून त्यांच्यावर मिरज पशुवैद्यकीय रूग्णालयात उपचार करण्यात आले.
करोली (एम) येथे भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. ग्रामस्थांकडून कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची वारंवार मागणी होत होती. गुरुवारी अनेक कुत्री सरपंच वस्ती आणि हणमंत वस्ती या ठिकाणी रस्त्याकडेला तसेच शेतामध्ये ठिकठिकाणी पडल्याचे दिसून आले.
दाखल करण्यात आले.
भटक्या कुत्र्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. त्यामुळे बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत होती. त्या पार्श्भूमीवर अचानक मोठ्या प्रमाणात कुत्र्यांना विषबाधा झाली असल्याचे आढळून आले आहे. नेमकी त्यांना कोणत्या अन्नातून विषबाधा झाली याबाबत गावात उलटसुलट चर्चा सुरू होती.