हरित लवादाने चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रास ठोठावला पाच कोटींचा दंड
Anchor
राष्ट्रीय हरित लवादाने चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रास पाच कोटी रुपयांचा दंड केला आहे. प्रदूषणावर आळा न घातल्याने हरित लवादाने हा दंड केला आहे.
व्हीवो
महाऔष्णिक वीज केंद्राविरुद्ध चंद्रपूर येथील सामाजिक कार्यकर्ते मधुसूदन रुंगठा यांनी तक्रार तसेच याचिका देखील दाखल करण्यात आली होती. त्यानुसार राष्ट्रीय हरित लवादाने चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रास पाच कोटी रुपयांचा दंड केला आहे. त्याचप्रमाणे वीज केंद्रातून होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक संयुक्त समिती स्थापन करण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत. या समितीत पर्यावरण मंत्रालयाच्या क्षेत्रीय समितीचे सदस्य, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य घेण्याचे निर्देश आहेत. ए बी न्यूज मराठी साठी धनंजय साखरकर, चंद्रपुर
पुणे म.न.पा.च्या वाघोली कार्यालयाचे वीज कनेक्शन महावितरणने तोडले
Anchor
पुणे महानगरपालिकेच्या वाघोलीतील महापालिका कार्यालयाचे वीज कनेक्शन महावितरणने तोडले आहे. बिलाची थकबाकी न भरल्याने ही कारवाई करण्यात आलीय.
व्हीवो
पुणे महानगरपालिकेने वाघोली मधील संपर्क कार्यालय तसेच सार्वजनिक वीज मीटरचे वीज बिल भरण्याकडे केलेले दुर्लक्ष आणि वीज बिलाची मोठी थकबाकी असल्याने महावितरणने वाघोलीतील सार्वजनिक मीटरचे कनेक्शन बंद केले आहेत. यामध्ये महापालिका वाघोली संपर्क कार्यालय, अंगणवाडी, स्ट्रीटलाईट आदींचा समावेश आहे. महापालिकेच्या एकूण ४३ थकीत मीटर पैकी जवळपास ३५ मीटरचे कनेक्शन तोडण्यात आले आहे.त्यामुळे वाघोलीतील कार्यालय अंधारमय झाले आहे. महावितरणकडून थकीत बिलामुळे वीज मीटर कनेक्शन तोडण्याची कारवाई करण्यात आली असल्याने वाघोलीकरांनी महापालिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महापालिका वाघोलीतून टॅक्स गोळा करत आहे, वाघोलीत विकास कामे देखील सुरु नाहीत, गोळा केलेला टॅक्सचा पैसा जातो कुठे असा सवाल वाघोलीतील ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. ए बी न्यूज मराठी साठी सचिन धुमाळ, पुणे