मालगावात रस्त्याचे काम बंद पाडले

 

मिरज : मालगाव (ता. मिरज) येथे रस्ता दुरुस्तीचे काम करीत असताना “हा आमचा रस्ता आहे. येथे काम काम करायचे नाही'', असे म्हणून शासकीय कामात अडथळा आणला. याप्रकरणी सहाय्यक बांधकाम

अभियंता सचिन दादासाहेब होवाळ यांनी पाच जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे.

यामध्ये दिलीप शिवपुत्र कोकणे, दीपक शिवपुत्र कोकणे, मुळाबाई शिवपुत्र कोकणे, पुष्पा दिलीप कोकणे व प्रियांका दिलीप कोकणे (सर्व रा. मालगाव, ता. मिरज) यांचा समावेश आहे. मालगाव येथील कोकणे- पाटील वस्ती येथील शासकीय रुस्ता दुरुस्तीसाठी सहाय्यक बांधकाम अभियंता सचिन होवाळ गेले होते. त्यावेळी ते रस्त्याचे काम सुरू करीत असताना वरील सर्व संशयितांनी मशिनच्या आडवे जाऊन काम काम थांबवले, त्यावेळी होवाळे यांनी “हा रस्ता पूर्वीपासून आहे. या रस्त्याच्या कामासाठी शासनाचा निधी खर्च झाला आहे"', असे समजावून सर्वांना सांगितले. परंतु संशवित पाच जणांनी हे रस्त्याचे काम बंद पाडून शासकीय कामात अडथळा आणला असल्याचे सहाय्यक बांधकाम अभियंता सचिन 'होवाल यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी पाच जणांविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Src test

AC NEWS RADIO l बाहेर पडताना काळजी घ्या l मास्क लावूनच बाहेर पडा l गर्दीत जाण्याचे टाळा l सैनी टायझर नेहमी जवळ ठ...