सोलापुरात रविवारी तब्बल ७६ नवे कोरोना रुग्ण : मृत्यूची संख्या झाली २४५


सोलापुरात रविवारी तब्बल ७६ नवे कोरोना रुग्ण : मृत्यूची संख्या झाली २४५

सोलापूर : सोलापूर शहरात रविवारी 76 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून त्यापैकी सात जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता मृत्यूची संख्या 245 झाली आहे. रुग्णसंख्येच्या तुलनेत सोलापुरातील मृत्यूदराचे प्रमाण राज्यात अव्वलच आहे. सोलापुरात आतापर्यंत दोन हजार 217 व्यक्‍तींना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी एक हजार 166 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मात्र, रविवारी 33 जणांना घरी सोडण्यात आले असून सद्यस्थितीत 806 रुग्णांवर विविध दवाखान्यांमध्ये उपचार सुरु आहेत. सोलापुरातील सात कोरोना पॉझिटिव्ह व्यक्‍तींचा रविवारी कोरोनामुळे मृत्यू झाला असून सातही रुग्ण 65 वर्षांवरील आहेत. त्यामध्ये साई विहार सोसायटी, कुमठा नाका येथील 65 वर्षीय महिला, दर्शना अर्पाटमेंट, श्रध्दानंद तालिमजवळील 65 वर्षीय पुरुष, माऊली कॉम्प्लेक्‍स, सळई मारुती मंदिराजवळील 65 वर्षीय पुरुष, दमाणी नगर, लक्ष्मी पेठेतील 83 वर्षीय पुरुष, रामवाडी येथील महापालिका शाळेजवळील 75 वर्षीय पुरुष, पश्‍चिम मंगळवार पेठेतील 65 वर्षीय महिला आणि न्यू तिऱ्हेगाव, फॉरेस्ट येथील 77 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. मृतांपैकी एकाला रविवारी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. तर उर्वरित मृत रुग्णांवर मागील काही दिवसांपासून उपचार सुरु होते.

Src test

AC NEWS RADIO l बाहेर पडताना काळजी घ्या l मास्क लावूनच बाहेर पडा l गर्दीत जाण्याचे टाळा l सैनी टायझर नेहमी जवळ ठ...