आघाडी सरकारचे छत्रपतींबद्दल प्रेम बेगडी : विक्रांत पाटील

 

इस्लामपूर: काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल बेगडी प्रेम आहे. हे पक्ष खरोखरच छत्रपतींचा आदर करत असतील तर त्यांनी काँग्रेस पक्षाची सत्तेतून हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी येथे पत्रकार बैठकीत बोलताना केली. महाडिक शिक्षण संकुलात झालेल्या पत्रकार परिषदेस प्रदेश उपाध्यक्ष राहुल महाडिक, अनुप मोरे, सुदर्शन पाटील, सचिव जयराज पाटील, प्रविण फोंडे उपस्थित होते.

विक्रांत पाटील म्हणाले, बंगळूर येथे झालेल्या छत्रपतींच्या पुतळ्याची बिटंबना करणाऱ्यावर कारवाईची मागणी महाविकास आघाडीमधील पक्ष करीत आहेत. त्यासाठी छत्रपतींच्या पुतळ्याला दुधाचाही अभिषेक घालत आहे. त्यामुळे दुधाचा अभिषेक घालणारे पक्ष आता काँगेसवाल्यांना डांबराचा अभिषेक घालणार आहेत का, असा सवालही त्यांनी केला.

ते. म्हणाले, राज्यातील युवा वर्ग, विद्यार्थी यांच्याबाबतीत आघाडी सरकार उदासीन आहे. ते फक्त तुंबड्या

भरण्यात व्यस्त आहे. त्यामुळे भाजप युवा मोर्चाला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागत आहे. एमपीएससी, म्हाडाच्या पेपर फुटीमागे कोणते रॅकेट आहे, याचा शोध घेणे गरजेचे आहे. या रॅकेटचे कनेक्शन मंत्रालयापर्यंत असून यामागे वेगळाच गॉडफादर आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी, अशी आम्ही राज्यपालांच्याकडे मागणी केली आहे.

विक्रांत पाटील म्हणाले, ऊर्जामंत्री नितीन राऊत हे सर्वात अयशस्वी मंत्री आहेत. भाजप युवा मोर्चाच्यावतीने करण्यात आलेल्या स्ट्रींग ऑपरेशनमध्ये त्यांनी मुलाला निवडून आणण्यासाठी महावितरणची सर्व यंत्रणा निवडणुकीत वापरल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पदाचा गैरवापर केल्याने त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी न्यायालयात जाणार आहे.

Src test

AC NEWS RADIO l बाहेर पडताना काळजी घ्या l मास्क लावूनच बाहेर पडा l गर्दीत जाण्याचे टाळा l सैनी टायझर नेहमी जवळ ठ...