सांगली : कोरोनाच्या सावटाखाली सुरू झालेल्या या वर्षात जिल्हा पोलीस दलाने आलेल्या आव्हानांना तोंड देत आपले वेगळेपणही सिद्ध केले. तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांना दिलासादायक वातावरण असावे यासाठी जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांनी आपले रूपडे बदलत एकच रंग आणि एकच सेवेस याच वर्षात सुरुवात केली. स्वच्छ, सुंदर पोलीस ठाण्यांसह कामकाजात शिराळा 'पोलीस ठाण्याने तर देशात टॉप
टेनमध्ये स्थान मिळवले.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी चोवीस तास ऑन ड्यूटी असलेल्या पोलिसांची एक चांगली प्रतिमा या वर्षात जनतेसमोर आली. नागरिकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी व त्यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांना आपुलकीने काम व्हावे यासाठी सर्व पोलीस ठाण्यांची रंगरंगोटी, बैठक व्यवस्था बदलून पोलीस ठाण्यांना
आकर्षक रूपडे देण्यात आले. याच वेगळेपणात शिराळा पोलीस ठाण्याचा देशपातळीवर गौरव झाला.
पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर अधीक्षक मनीषा दुबुले यांनी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविताना, चोरी
जेलेला मुद्देमाल मूळ मालकांना परत केला. वर्षानुवर्षे पोलीस ठाण्यांच्या आवारात गंजत पडलेली वाहनेही याच वर्षात लिलावाद्वारे हटविण्यात आली. जिल्ह्यात अजूनही मागणी असलेल्या नवीन पोलीस ठाण्यांचा मुहूर्त यावर्षीही लागला नाही.