“आरोग्य'च्या ५० टक्के रिक्त् जागा : दत्तात्रय पाटील

 

सांगली : जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांची ५० टक्के पदे रिक्‍त असून, ती तातडीने भरावीत, अशी

मागणी आरोग्य कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील यांनी केली.

ते म्हणाले की, जिल्ह्यात आरोग्य सेविकांची मंजूर पदे ५७९ असून, कार्यरत २४५ आहेत. आरोग्य सेवकाची

मंजूर पदे ४४२ असून, १०७ कार्यरत आहेत. ५० टक्क्यांहून जास्तच आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे रिक्‍त आहेत.

हे सर्व कर्मचारी रजा, सुट्या न घेता गेल्या दोन वर्षांपासून काम करत आहेत.

उपलब्ध कर्मचाऱ्यांमध्ये जास्त काम करावे लागत असल्यामुळे त्यांचे खच्चीकरण होत आहे. यातच पुन्हा

केंद्र शासनाने १२ ते १८ वयोगटांतील मुलांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. उर्वरित नागरिकांना बुस्टर डोसही दिला जाणार आहे. या मोहिमेपूर्वी शासनाने आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्‍त पदे भरावीत, त्यानंतरच मुलांचे व बुस्टर डोसची लसीकरण मोहीम राबवावी.

Src test

AC NEWS RADIO l बाहेर पडताना काळजी घ्या l मास्क लावूनच बाहेर पडा l गर्दीत जाण्याचे टाळा l सैनी टायझर नेहमी जवळ ठ...