चाँद उर्दू स्कूलमध्ये अमृत महोत्सवी मानवी साखळी

 

मिरज : मिरजेत चौंद उर्दू स्कूल व हायस्कूलमध्ये देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा

करण्यात येत आहे.

चाँद उर्दू हायस्कूलमध्ये मुलींनी मानवी साखळी केली होती. चित्रकला, रांगोळी व निबंध स्पर्धा पार पडल्या. भारतीय टपाल व शालेय शिक्षण व साक्षरता विभाग यांच्या समन्वयातून प्रकाशझोतात न आलेले

_ स्वातंत्र्यलढ्यातील नायक व माझ्या दृष्टिकोनातील २०४७ मधला भारत देश या विषयावर पोस्ट कार्ड लेखन स्पर्धेत पाचवी ते दहावीतील शंभर टक्के विद्यार्थी सहभागी होते. उर्दु इंग्रजी, हिंदी, मराठी भाषेतून

विद्यार्थ्यांनी पोस्ट कार्डावर स्वातंत्र्य या विषयावर लेखन केले. प्रत्यक्षात पोस्ट कार्डवर पत्र लिहिण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. सदिका अंजुम 'पिरजादे, फरहा पटेल, अंजुम पटेल, 'तहमीना शेख, समीरा शरीकमसलत यांनी संयोजन केले.

Src test

AC NEWS RADIO l बाहेर पडताना काळजी घ्या l मास्क लावूनच बाहेर पडा l गर्दीत जाण्याचे टाळा l सैनी टायझर नेहमी जवळ ठ...