नववर्षाचे जल्लोषात स्वागत

 

सांगली : सांगली शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले. पोलिसांचा कडक बंदोबस्त असतानाही काही ठिकाणी तरुणांनी रस्त्यावर उतरून फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजी केली.

कोरोना संसर्ग पुन्हा एकदा वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर 'पोलिस आणि महसूल प्रशासनाने विविध निर्बंध लागू करून त्याची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळे यंदाच्या थर्टी फर्स्ट आणि नववर्षाचे स्वागत कार्यक्रमावर कोरोना संसर्गाचे सावट दिसून येत होते. तरीसुद्धा थर्टी फर्स्ट निमित्ताने अनेकांनी पार्ट्यांचे नियोजन केले होते. काहींनी हॉटेलमध्ये तर काहींनी घरात, टेरेसवर थर्टी फर्स्ट साजरा करीत रात्री उशिरापर्यंत जागून नववर्षाचे स्वागत केले. कोरोना संसर्गामुळे यंदा मोठ्या कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे. त्याशिवाय रात्रीची जमावबंदी आदेश लागू करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकांनी छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. रस्त्यावरून ये-जा करणार्‍यांची रात्रीच्यावेळी कसून तपासणी करण्यात येत होती. त्यामुळे अनेकांनी घरातच नववर्षाचे स्वागत आणि आनंद साजरा केला. रात्री बाराच्या

सुमारास काही ठिकाणी तरुणांनी रस्त्यावर उतरून फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला. काही ठिकाणी रस्त्यावर वेलकम २०२२' अशी अक्षरे रेखाटण्यात आली होती.

सांगली शहरात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हा परिषदेसमोर , विश्रामबाग येथे अजय देशमुख यांनी आणि राम मंदिर येथे रिक्षा संघटनेतर्फे 'दारू नको दूध प्या' या उपक्रमांचे सायंकाळी आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.

Src test

AC NEWS RADIO l बाहेर पडताना काळजी घ्या l मास्क लावूनच बाहेर पडा l गर्दीत जाण्याचे टाळा l सैनी टायझर नेहमी जवळ ठ...