महावितरण कर्मचाऱ्यावर चाकूहल्ला

 

मिरज : घरातील विद्युत कनेक्शन तोडल्याच्या कारणातून महावितरणचे कर्मचारी मुबीन मकसुद शेख यांच्यावर 'मोहीन आसिफ नदाफ (रा. नदाफ गल्ली, मिरज) याने चाकूहल्ला केला अशी तक्रार आहे. याप्रकरणी शेख यांनी नदाफ याच्याविरुद्ध मिरज शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

नदाफ याच्या घरातील विद्युतपुरवठा खंडित झाला होता. याबाबत नदाफ याच्या वडिलांनी महावितरणकडे सायंकाळी तक्रार केली होती. यावेळी 'डीपी फ्यूज गेली आहे. दुसर्‍या दिवशी सकाळी विद्युत कनेक्शन जोडले जाईल', असे त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार दुसर्‍या दिवशी विद्युत कनेक्शन जोडण्यात आले होते. परंतु शेख यांनीच मुद्दाम विद्युत कनेक्शन तोडल्याचा नदाफ याचा संशय होता.

बुधवारी रात्री शेख तहसीलदार गल्ली येथून दुचाकीवरून जात असताना नदाफ याने त्यांना अडविले. त्यावेळी तू आमच्या घराचे विद्युत कनेक्शन का तोडले, मस्ती आली आहे का? तुला आता दाखवतो'' असे

म्हणून दंडाबर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले, असे शेख यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत मिरज शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Src test

AC NEWS RADIO l बाहेर पडताना काळजी घ्या l मास्क लावूनच बाहेर पडा l गर्दीत जाण्याचे टाळा l सैनी टायझर नेहमी जवळ ठ...